मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सागर तळशिकर यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्याच्या ट्राफिकचा भय़ंकर अनुभव आला होता. आपल्या ८५ वर्षांच्या आईबरोबर ते तब्बल पाच तास पुण्याच्या ट्राफिकमध्ये अडकले होते. यानंतर सागर तळशिकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत याबाबत संताप व्यक्त केला आहे.
सागर तळशिकर यांनी त्यांच्या फेसबुकवरुन एक व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “मित्रहो, हा काल दिनांक २४ जुलैचा व्हिडिओ आहे. मी दुपारी १.३० ते ७.३० अडकलो होतो. ८.३० वाजता पुण्यात घरी पोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर पाच ते सहा तास होतो. ७००-८०० मीटर मागे पुढे झालो..असू इतकेच...कुणीही तिथे ट्राफिक कंट्रोलला नव्हते,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ना सुपरहिरो ना बिग बजेट, तरीही ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाने ११ दिवसांत कमावले ७० कोटी
‘ओपेनहायनर’मधील भगवद्गीतेच्या ‘त्या’ सीनवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “हिंदू-मुस्लीम...”
पुढे त्यांनी “माझी ८५ वर्षांची आई जिचं नुकतंच मोतीबिंदू ऑपरेशन झालं आहे ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्या पण घ्यायच्या होत्या. असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यानी करायचं काय? स्त्रियांच्या बाथरूमच्या प्रॉब्लेमच काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही. आणि ७.३० ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तिथं कुणीही त्या ट्राफिकला कंट्रोल करायला, वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही ट्राफिक किंवा पोलीस नव्हता. कुणी कार्यकर्ते पण नव्हते...भयंकर आहे हे...शक्य असल्यास शेअर करा...चुकून काही कारावसं वाटलं संबंधिताना तर इतरांना उपयोगी पडेल...शक्यता कमीच आहे, पण तरी….सर्वांचे मनःपूर्वक आभार...आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे,” असं म्हणत सागर तळशिकर यांनी संताप व्यक्त केला आहे.