Join us

हाताला सलाईन अन्...; जुई गडकरीला काय झालं? रुग्णालयातील फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 6:22 PM

नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही जुई चाहत्यांना देत असते. सध्या जुईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी अभिनेत्रीने दिली आहे. 

जुई गडकरी हा मराठी कलाविश्वाचा लाडका चेहरा आहे. पुढचं पाऊल मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचली. या मालिकेने जुईला प्रसिद्धी मिळवून दिली. जुईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन जुई चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही जुई चाहत्यांना देत असते. सध्या जुईच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी अभिनेत्रीने दिली आहे. 

जुईने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जुईच्या हाताला सलाईन लावल्याचं दिसत आहे. जुईला काही कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, याबाबत अद्याप अभिनेत्रीने कोणतीही माहिती दिलेली नाही. हा फोटो शेअर करत जुई म्हणते, "सलाईन काढलं, डिस्चार्ज मिळाला...काय झालं होतं त्याबाबत लवकरच कळवेन", असं जुईने म्हटलं आहे. जुईची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, 'पुढचं पाऊल' मालिकेत सोज्वळ आणि साध्या सुनेची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 'पुढचं पाऊल'नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'वर्तुळ', 'सरस्वती' या मालिकांमध्ये ती झळकली. 'बिग बॉस मराठी'मध्येही जुई सहभागी झाली होती. आता सध्या ती स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकार