Join us  

'ठरलं तर मग'मधील साक्षीच्या रिअल लाईफ पार्टनरला पाहिलं का? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 3:49 PM

मालिकेत कट कारस्थाने करणारी आणि चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी साक्षी रिअल लाईफमध्ये विवाहित आहे. केतकीने तिच्या सोशल मीडियावरुन नुकतंच तिच्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच तिचं स्थान टिकवून असते. या मालिकेबरोबरच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते. तर मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असलेली साक्षी प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असते. 

या मालिकेत साक्षी हे पात्र अभिनेत्री केतकी विलास साकारत आहे. केतकीला या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली आहे. 'ठरलं तर मग' मालिकेमुळे केतकी घराघरात पोहोचली आहे. मालिकेत कट कारस्थाने करणारी आणि चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी साक्षी रिअल लाईफमध्ये विवाहित आहे. केतकीने तिच्या सोशल मीडियावरुन नुकतंच तिच्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

केतकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत ती चाहत्यांना माहिती देत असते. तर वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडीही ती शेअर करत असते. केतकी तिच्या नवऱ्याबरोबरचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आतादेखील तिने नवऱ्याबरोबचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "आयुष्याक एक तरी योग्य व्यक्ती असतेच...आणि यावर माझा विश्वास आहे. १६ वर्षांपूर्वी मी त्याला हो म्हणाले होते. आम्ही mismatched आहोत...पण, एकमेकांवर प्रेम करण्याचे मार्ग शोधत असतो", असं कॅप्शन दिलं आहे. 

केतकीच्या नवऱ्याचं नाव गंधर पटवर्धन असं आहे. या दोघांना एक मुलगीदेखील आहे. तिचं नाव ईश्वरी आहे. दरम्यान, केतकीने अनेक नाटक आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत ती झळकली होती. 'कुसुम' मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारस्टार प्रवाहसेलिब्रिटी