छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ ही लोकप्रिय मालिका आहे. अल्पवाधीतच स्टार प्रवाहवरील या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिनेत्री मोनिका दाबाडे या मालिकेत अस्मिता ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोनिकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरबद्दल भाष्य केलं. मनोरंजन विश्वात करिअर करताना मोनिकाला अनेक अडचणींचा आणि कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. मोनिकाने वैयक्तिक आयुष्य आणि करिअरबाबत अनेक खुलासे केले.
‘ईटाम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मोनिका म्हणाली, “२०११ पासून मी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. कॉलेज जीवनात मला माझ्या भूमिकांसाठी अनेकदा अवॉर्ड्सही मिळाले आहेत. तेव्हाच मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. २०१३ मध्ये मी पुण्याहून मुंबईला आले. तेव्हा मला टीव्ही मालिकेत पहिला ब्रेक मिळाला. मी ‘जय महाराष्ट्र बठिंडा’ आणि ‘राजमाता जिजाऊ’ या चित्रपटांतही काम केलं आहे.”
या मुलाखतीत मोनिकाने लॉकडाऊनमधील कठीण काळाबद्दलही भाष्य केलं. “मी मुंबईत आल्यानंतर अनेकत ऑडिशन्स दिल्या. मी मुळची पुण्याची असल्याने मुंबईत राहणं आणि काम करणं हे माझ्यासाठी मानसिक, आर्थिदृष्ट्या थोडं कठीण होतं. कोविडनंतर माझ्याकडे काम नव्हतं. माझ्याकडचे पैसेही संपले होते. मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यानंतर अजून काही काळ वाट बघायचं मी ठरवलं. त्यानंतर मला ‘आई मायेचं कवच’ ही मालिका मिळाली. आणि त्यानंतर ‘ठरलं तर मग’मध्ये काम मिळालं. पण, याकाळात मी माझ्या आईवडिलांकडे पैसे मागितले नाहीत. या गोष्टीसाठी मला स्वत:चा अभिमान वाटतो,” असं मोनिकाने सांगितलं.
“...म्हणून 'गदर २' सुपरहिट झाला”, हेमा मालिनींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, “ओटीटी आणि वेब सीरिज...”
मोनिकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१३ साली तिला पहिल्यांदा टीव्ही मालिकेत ब्रेक मिळाला. त्यानंतर ती ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘मी तुझीच रे’, ‘आई मायेचं कवच’ अशा मालिकांमध्येही झळकली. आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.