Join us

रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते 'ठरलं तर मग'मधील अर्जुनची आई, सिनेमातही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 4:46 PM

अर्जुनची आई कल्पना हे पात्र साकारून अभिनेत्री प्राजक्ता दिघे घराघरात पोहोचल्या. टीव्हीवर संस्कारी सून आणि साध्या भोळ्या दिसणाऱ्या प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहेत. 

'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच तिचं स्थान टिकवून असते. या मालिकेबरोबरच त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते. तर अर्जुनची आई साध्या सरळ स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. 

या मालिकेत अर्जुनची आई कल्पना हे पात्र साकारून अभिनेत्री प्राजक्ता दिघे घराघरात पोहोचल्या. मालिकेत नेहमी सायलीची बाजू घेणारी आणि तिची खंबीरपणे साथ देणारी कल्पना आई प्रेक्षकांचीही लाडकी आहे. प्राजक्ता दिघे या त्यांच्या लाघवी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. टीव्हीवर संस्कारी सून आणि साध्या भोळ्या दिसणाऱ्या प्राजक्ता खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहेत. 

प्राजक्ता या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतेच त्यांनी त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी फॅमिलीबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. नेटच्या साडीत प्राजक्ता यांचं सौंदर्य खुललेलं पाहायला मिळत आहे. साधा मेकअप करत त्यांनी खड्यांची ज्वेलरी घातली आहे. या फोटोमध्ये त्यांचा मुलगा आणि पतीदेखील दिसत आहेत. 

'चार दिवस सासूचे', 'का रे दुरावा', 'छत्रीवाली', 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकांमध्ये प्राजक्ता यांनी काम केलं आहे. मालिकांबरोबरच सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत. 'धडाकेबाज', 'पोर बाजार', 'बायको आली बदलून' या सिनेमांमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीस्टार प्रवाह