स्वप्नांची नगरी म्हटली जाणारी मुंबई इथल्या प्रत्येक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. उद्योगपतींपासून ते बॉलिवुड कलाकारांपर्यंत, मजूरांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनाच मुंबई प्रिय आहे. मात्र मुंबईत प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या कामासाठी धावतानाच दिसत असते. रस्त्यांवर तासनतास वाहतूक कोंडीत अडकण्यापेक्षा मुंबईकर लोकलला पसंती देत असतात. यामध्ये राजकारणी आणि उद्योगपती देखील मागे राहिले नाहीत. इच्छूक स्थळी पोहोचण्यासाठी मोठे सेलिब्रेटीदेखील मुंबई लोकलचा वापर करताना दिसून येत होतात. आता यामध्ये भर पडली आहे ती मराठमोळा अभिनेता अमित भानुशाली याची.
अमित भानुशालीने शेअर केलेल्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमितने थेट मुंबईची लाईफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलने प्रवास करत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं '५ ते ७ ट्रेन सोडल्यावर मला आता गाडीत चढायला मिळालं' असं कॅप्शन दिलं. दुसऱ्या एका फोटोला 'अखेर आता मी मोकळा श्वास घेऊ शकतो' असं कॅप्शन त्यानं दिलं.
आमितच्या या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली असून चाहते त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. अभिनेता अमित भानुशाली सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जून सुभेदार हे पात्र साकारत आहे. त्याच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील सायली-अर्जूनची केमेस्ट्री लोकांच्या पसंतीस पडली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमित हा चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तो विविध व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याच्या नावावर एक युजर पैसे उकळत असल्यानं तो प्रकाशझोतात आला होता.
अमित भानुशाली फॅनपेज या पेजवरून अभिनेत्याच्या नावे एक अज्ञात यूजर नेटकऱ्यांकडून पैसे उकळवण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब अमितच्या लक्षात येताच त्याने आपल्या चाहत्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. या बनावट अकाऊंटवरून अनेकांकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. तरी काही लोक या फसवणुकीला बळी देखील पडल्याचं देधील समजतंय. त्यामुळेच आता स्वतः अभिनेत्याने पोस्ट करून, सगळ्यांना या स्कॅमची माहिती दिली आहे. 'मला या डोनेशनबद्दल काही माहीत नाही... कृपया कोणी ही पैसे पाठवून नका' असं आवाहन त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना केलंय.