Join us

'तिच लोकं आज माझ्यासोबत...'; 'ठरलं तर मग'फेम अभिनेत्रीला नातेवाईकांनी दिला होता त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 2:31 PM

Prajakta kulkarni: दहावीमध्ये असताना प्राजक्ता यांना चित्रपटात काम करायची संधी मिळाली.

कलाविश्वात आज असंख्य कलाकारांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेक कलाकारांनी यश, प्रसिद्ध यांचं शिखर गाठलं आहे. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक खाचखळे, लोकांची दुषणं ऐकत या कलाकारांना सिनेसृष्टीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण करावं लागलं. यामध्येच मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी हिने तिला सहन कराव्या लागलेल्या त्रासावर भाष्य केलं आहे.

'ठरलं तर मग' या मालिकेतील कल्पना सुभेदार ही भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी साकारत आहे. आज प्राजक्ता मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. परंतु, त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. एकेकाळी त्यांनी नातेवाईकांनी अनेक नावं ठेवली होती. प्राजक्ता कलाविश्वात नशीब आजमावते याचीही नातेवाईकांनी खिल्ली उडवली होती.

प्राजक्ता कुलकर्णी यांनी बालमोहन शाळेतून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये पाचवीत असताना त्यांनी सुलभा देशपांडे यांच्या चंद्रशाळामध्ये सहभाग घेतला होता. तेथे गेल्यानंतर त्यांच्यात नृत्याची आवड निर्माण झाली. दहावीमध्ये असताना प्राजक्ता यांना चित्रपटात काम करायची संधी मिळाली. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात सिनेसृष्टीत पदार्पण करणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. मात्र, आई-वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. मात्र, प्राजक्ता चित्रपटात काम करणार हे ऐकून नातेवाईकांना त्यांना नाव ठेवायला सुरुवात केली.

प्राजक्ता यांना पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. आणि, पाहता पाहता त्या लोकप्रिय नायिका झाल्या. विशेष म्हणजे प्राजक्ता यांची लोकप्रियता पाहता त्यांना नावं ठेवणारे नातेवाईकही तिची ओळख सांगून सगळीकडे मिरवू लागले.

दरम्यान, धडाकेबाज या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होत प्राजक्ता कुलकर्णी यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यांनी साकारलेल्या गावरान ठसकेबाज गंगूची भूमिका विशेष गाजली. या चित्रपटानंतर त्या  'आग', 'शोध', 'ऋणानुबंध','छत्रीवाली', 'पोरबाजार', 'का रे दुरावा', 'दुर्गेश नंदिनी', 'धांगड धिंगा'. 'ऑल द बेस्ट', 'दामिनी', 'आपली माणसं', 'चार दिवस सासूचे अशा चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. 

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनलक्ष्मीकांत बेर्डे