Join us

म्हणून डॉ. अमोल कोल्हेंना फॅन्स देतात तलवार भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 8:00 AM

ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांना आजवर विविध कार्यक्रमांमधून तब्बल दीडशेहून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत.

ठळक मुद्देडॉ. अमोल कोल्हे यांच्या कामाचा सन्मान म्हणून तलवार भेट दिली गेलीआतापर्यंत त्यांना जवळपास दीडशेहुन अधिक तलवार भेट म्हणून मिळाल्या आहेत

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजीराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली आहे.  ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांना आजवर विविध कार्यक्रमांमधून तब्बल दीडशेहून अधिक तलवारी भेट म्हणून मिळाल्या आहेत. त्यामुळे म्यानातून उसळणाऱ्या या तलवारींशी अमोल यांचं एक वेगळंच अतूट असं नातं तयार झालं आहे.

काही वर्षांपूर्वी आलेल्या 'राजा शिवछत्रपती' मालिकेमध्ये डॉ. कोल्हे यांनी साकारलेली शिवरायांची भूमिका आणि ती मालिकाही अजरामर ठरली. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. तसंच कोल्हे यांनी 'शंभूराजे' या नाटकाचे ५२० प्रयोगही सुरुवातीच्या काळात केले होते. त्यानंतर 'शिवपुत्र संभाजी राजे' या महानाट्याचे त्यांनी १२५ प्रयोग केले. सध्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहेत. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांची भूमिका साकारत असताना अमोल कोल्हे यांना विविध ठिकाणी त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून तलवार भेट दिली जाते. त्यापैकी दोनच तलवारी त्यांनी स्वत:कडे ठेवल्या असून, उर्वरित तलवारी ते टीममधल्या लोकांना देत असतात.

या अनोख्या भेटीबद्दल बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "शिवाजी आणि संभाजी राजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. माझ्या या कामाचं कौतुक म्हणून अनेक ठिकाणी मला तलवार भेट म्हणून दिली जाते. साधारणपणे दीडशेहून अधिक तलवारी मला आजवर भेट म्हणून मिळाल्या आहेत. पण हा सन्मान केवळ माझ्या एकट्याचा नाही. माझ्यासोबत काम करण्याऱ्या संपूर्ण टीमच्या कामाचं हे फलित आहे. त्यामुळे भेट म्हणून मिळालेल्या तलवारी पैकी फक्त २ तलवारी मी माझ्या जवळ ठेवल्या आहेत. इतर सर्व तलवारी मी माझ्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत."

टॅग्स :स्वराज्य रक्षक संभाजीडॉ अमोल कोल्हेझी मराठी