Join us

गोविंदाला स्टार बनवण्यामागे बॉलिवूडमधील या दिग्गज व्यक्तीचा होता मोठा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:19 IST

Superstar Singer 2:'सुपरस्टार सिंगर २'मध्ये या रविवारी ‘गोविंदा आणि चंकी’ विशेष भाग असणार आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'सुपरस्टार सिंगर २' (Super Singer 2) मध्ये या रविवारी ‘गोविंदा आणि चंकी’ विशेष भाग असणार आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आलेख गगनाला भिडेल यात काही शंका नाही. या भागात बॉलिवूडचे दोन कॉमेडी किंग गोविंदा (Govinda) आणि चंकी पांडे (Chunky Panday) मंचाची शोभा वाढवणार आहेत. हे दोघे या भागात ‘राजा बाबू’ आणि ‘आखरी पास्ता’ या आपल्या गाजलेल्या भूमिकांच्या वेशभूषेत दिसतील. या भागात स्पर्धकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस बरोबरच मस्ती, विनोद, डान्स, रंजक किस्से कहाण्यांची बहार असणार आहे, ज्यामुळे हा वीकेंड नक्कीच संस्मरणीय होईल!

 आमंत्रित कलाकार गोविंदा आणि चंकी पांडे स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसतील. असाच एक परफॉर्मन्स त्यांचे लक्ष वेधून घेईल. तो परफॉर्मन्स म्हणजे ऋतुराज आणि हर्षिता या स्पर्धकांनी आपल्या गोड आवाजात सादर केलेले त्यांच्या ‘आंखें’ चित्रपटातील ‘ओ लाल दुपट्टे वाली’ हे गाणे! ऋतुराज आणि हर्षिताचे गाणे ऐकून हे दोन्ही अभिनेते थक्क तर झालेच, पण त्यांना या चित्रपटाचे शूटिंग करताना आलेले अनुभव देखील आठवले.

त्या सुंदर दिवसाची आठवण काढत आणि त्याला प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले त्याने भारावून जात गोविंदा आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगताना दिसेल. डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची आठवण काढत गोविंदाने आपल्याला स्टार बनवण्याचे श्रेय बप्पीदांना दिले. तो म्हणाला, “सुपरस्टार सिंगर २च्या या मंचावर मी बप्पीदांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांच्याशिवाय माझा हा प्रवास शक्य झाला नसता. आज मी जो ‘गोविंदा’ आहे, तो केवळ त्यांच्या गाण्यांमुळेच आहे. त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. अशा महान लोकांचे आशीर्वाद कलाकारासाठी जादूच करत असतात. माझ्याकडेच पाहा ना, माझ्याकडे त्यावेळी काहीच नव्हते. पण त्याच्या छायेत राहून मी स्टार झालो. माझ्या चित्रपटांसाठी इतकी छान छान गाणी दिल्याबद्दल मी खरोखर त्यांचा ऋणी आहे.” गोविंदाने पुढे हे देखील सांगितले की, गाण्याच्या शब्दांबद्दल काही सूचना केल्यास बप्पी दा त्या सूचनेला मान द्यायचे.सुपरस्टार सिंगर २, या शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहा. 

टॅग्स :गोविंदाचंकी पांडे