Join us

'नवा गडी नवं राज्य' मालिकेत या अभिनेत्रीची एन्ट्री, राघव आनंदीच्या संसारात पुन्हा येणार वादळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:51 IST

Nava Gadi Nava Rajya : नवा गडी नवं राज्य मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत आता नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे ती म्हणजे योजनाची. योजनाच्या पात्रामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. तिच्या येण्यामुळे राघव आणि आनंदीच्या सुखी संसारात पुन्हा विघ्न तर येणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

नवा गडी नवं राज्य या मालिकेत राघव आणि आनंदीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे एकत्र येतात. त्यावेळी चिंगी तिच्या नव्या आईबद्दल भरभरून बोलताना दिसते. आता राघव आनंदीचा संसार सुखात सुरू आहे, अशातच आता योजनाची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात तुमचा मुलगा खूप आजारी आहे असा योजनाला एक फोन येतो. त्यावेळी योजना खूप घाबरून जाते आणि आई आजारी आहे असे खोटे सांगून ती आनंदीचा निरोप घेऊन घरी जायला निघते. योजना एकटीच बदलापूरला राहते तिचे आई वडील नाशिकला असतात. मग अचानक तिची आई तिच्याजवळ कशी राहायला येते असा संशय आनंदीच्या मनात घोळत असतो. योजना नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतीये हे आनंदीच्या लक्षात येते. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या धामधुमीत ती या गोष्टीकडे कानाडोळा करते. योजना खोटं का बोलली याचा उलगडा मालिकेतून लवकरच होणार आहे.

आकांक्षा गाडेच्या वर्कफ्रंटबद्दल...योजनाचे पात्र अभिनेत्री आकांक्षा गाडेने साकारले आहे. आकांक्षाने हिंदी नाटक, मराठी मालिका, चित्रपटात काम केले आहे. सारे तुझ्याचसाठी, अस्सं सासर सुरेख बाई, डिअर जिंदगी, शेक्सपिअरचा म्हातारा अशा नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच आकांक्षा उत्कृष्ट नृत्यांगना आहे. शांघाय या हिंदी चित्रपटासाठी तिने सहाय्यक नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम पाहिले होते.