Join us

छोट्या पडद्यावर पुन्हा पाहायला मिळणार श्रीरामांची महागाथा, 'श्रीमद् रामायण' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:56 IST

आतापर्यंत आपण छोट्या आणि रुपेरी पडद्यावर श्रीरामांची कथा पाहिली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला त्यांची महागाथा छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

आतापर्यंत आपण छोट्या आणि रुपेरी पडद्यावर श्रीरामांची कथा पाहिली आहे. आता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला त्यांची महागाथा छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच ‘श्रीमद् रामायण’ ही मालिका दाखल होत आहे. या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या मालिकेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका अभिनेता सुजय रेऊ साकारणार आहे.

'श्रीमद् रामायण' ही मालिका १ जानेवारी २०२४ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे.  

या भूमिकेबद्दल सुजय रेऊ म्हणाला की,‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यावधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”