Join us

'झलक दिखला जा' शोचा रंगणार अंतिम सोहळा, कधी आणि कुठे पाहता येणार हा ग्रॅण्ड फिनाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 17:16 IST

Jhalak Dikhla Jaa 11 : प्रसिद्ध डान्स सेलिब्रिटी रिॲलिटी शो 'झलक दिखला झा'चा ११वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

सोनी टीव्हीच्या सेलिब्रिटी डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा' सीझन ११ (Jhalak Dikhla Jaa 11) च्या ग्रँड फिनालेबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. झलकच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या टॉप ५ फायनलिस्टपैकी कोणता स्पर्धक आपल्या शानदार अभिनयाने जज आणि प्रेक्षकांना प्रभावित करणार आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

प्रसिद्ध डान्स सेलिब्रिटी रिॲलिटी शो 'झलक दिखला झा'चा ११वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज म्हणजेच २ मार्च २०२४ रोजी मलायका अरोराच्या शोचा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या शोएब इब्राहिम, धनश्री वर्मा, श्रीराम चंद्रा, अद्रिजा आणि मनीषा राणी या पाच पैकी एक स्पर्धक झलक ट्रॉफी जिंकणार आहे. 

‘झलक दिखला जा’चा ग्रँड फिनाले सोनी टीव्ही आणि ओटीटी ॲप सोनी लिव्हवर दाखवला जाईल. हा शो २ मार्च २०२४ रोजी रात्री ८ वाजल्यापासून थेट पाहू शकता. ८ वाजता सुरू होणारा हा शो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहू शकतो. या ४ तासांच्या दीर्घ डान्स सेलिब्रेशनच्या शेवटी, शोच्या जज मलायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी शोच्या विजेत्याची घोषणा करतील. मनीषा राणीने 'झलक दिखला जा'ची ट्रॉफी जिंकल्याचे बोलले जात आहे, मात्र वाहिनी किंवा अभिनेत्रीकडून याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

विजेत्याला मिळतील २५ लाख 'झलक दिखला जा ११' च्या विजेत्याला सोनी टीव्हीकडून ट्रॉफी आणि २५ लाखांची रक्कम दिली जाईल. पैसे आणि ट्रॉफी सोबतच विजेत्याला अबुधाबीला मोफत टूर देखील भेट दिली जाईल.

हे स्पर्धक पोहचले अंतिम फेरीतशोएब इब्राहिम हा झलक दिखला जाच्या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. त्याला त्याची पत्नी दीपिकासाठी झलक ट्रॉफी जिंकायची आहे. धनश्री वर्माबद्दल बोलायचे तर ती प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी आहे आणि तिच्या डान्स व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाली आहे. श्रीराम चंद्र आणि अद्रिजा या दोघांनी यापूर्वीही सोनी टीव्हीच्या रिॲलिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. श्रीराम इंडियन आयडॉलचा विजेता आहे आणि अद्रिजा सुपर डान्सरच्या सीझनची विजेती होती. बिग बॉस ओटीटीनंतर प्रसिद्धीझोतात आलेली मनीषा राणी सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर आहे.