Join us

"आपल्याच मूळ गावात नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद वेगळाच..", संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 7:12 PM

Sankarshan Karhade : संकर्षण हा सध्या त्याच्या नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) या नाटकाचे प्रयोग करत आहे. नुकताच या नाटकाचा प्रयोग बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे पार पडला.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)  हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. संकर्षण हा सध्या त्याच्या नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) या नाटकाचे प्रयोग करत आहे. नुकताच या नाटकाचा प्रयोग बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे पार पडला. अंबेजोगाई हे संकर्षणचं मूळ गाव आहे. यानिमित्ताने अभिनेत्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संकर्षण कऱ्हाडेने फोटो शेअर करत लिहिले की, आज अंबेजोगाईमध्ये नाटकाचा प्रयोग आहे. आमचं मूळ गांव अंबेजोगाई. इथे आमचा छोटासा वाडा आहे.. वाड्यात मारुतीचं मंदिर.. आज नाटकवाली मंडळी घरी आली.. मग योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं.. आणि मग दिवस सरता सरता आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळी जाउन आलो. फार शांत वाटलं.

त्याने पुढे म्हटले की, लहानपणापासून अंबेजोगाईची ओढ आहेच. उन्हाळ्याची सुट्टी लागली की, हनूमान जयंतीला घरच्या मारूतीच्या उत्सवाला यायचं….सगळं आठवत आठवत आज दिवस छान गेला..आता रात्री आपल्याच मूळ गावांत आपणच लिहिलेल्या आणि काम करत असलेल्या नाटकाचा प्रयोग करायचा… आनंद वेगळाच. #नियमवअटीलागू. आज ७ फेब. रा. ८ वा. अंबेजोगाई. ८ फेब. उद्या रा. ९.३० वा छ. संभाजीनगर. ९ फेब. सायं. ६.३० वा. जळगांव

वर्कफ्रंट..

संकर्षण कऱ्हाडेने २०११ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आभास हा या मालिकेतून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. संकर्षणने मला सासू हवी, 'खुलता कळी खुलेना' आणि माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्रात त्याच्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचे प्रयोग सुरू आहेत.