टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) शोमधील तीर्थानंद राव (Teerthanand Rao) या कॉमेडियनने फेसबुकवर लाईव्ह येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळेवर तिथं पोहोचून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करुन त्याचा जीव वाचवला होता. तीर्थानंदची शोमध्ये ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख मिळाली आहे.
यादरम्यान त्याने आपल्या कथित गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप केले होते. लिव्ह इन पार्टनरमुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असा खुलासा त्याने केला होता. पण जेव्हा तीर्थनंदच्या गर्लफ्रेंडचा याबद्दल पोलिसांनी जबाब नोंदवला तो हैराण करणारा होता. गर्लफ्रेंड म्हणाली मरु दे त्याला, तसंही मी त्याला सोडणारच होते.
जेव्हा पोलिसांनी तीर्थानंद राव यांच्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि तिला हॉस्पिटलमध्ये बोलवायचे होते तेव्हा तिने तिला मरू द्या, मी तिला सोडून जाणार आहे असे म्हणत कॉल डिस्कनेक्ट केला. 'आज तक'शी बोलताना तीर्थानंदने सांगितले की, तो ज्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तिच त्याचा छळ करते. तीर्थानंदने त्याच्या या अवस्थेसाठी तिलाच जबाबदार धरले आणि सांगितले की त्याला आता जगायचे नाही.
तीर्थानंदने माहिती देत सांगितले होते की,'काही दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली होती. आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. पण सोबत राहत असताना समजलं की ती प्रोस्टिट्यूट आहे. मी तिच्यापासून दूर गेलो. पण तिने माझ्यावर केस केली, मला धमक्या दिल्या. यामुळेच मी गेल्या अनेक दिवसांपासून घरीही गेलो नाही. तिच्यामुळे माझ्यावर ३ ते ४ लाख रुपयांचं कर्ज झालं. मला फूटपाथवर राहावे लागले आणि मी तणावात गेलो. याच कारणाने मी हे पाऊल उचलले.'
तीर्थानंद रावने 'द कपिल शर्मा शो'सह 'वागले की दुनिया' या टीव्ही शोमध्येही काम केले होते. या वर्षी जानेवारीमध्ये तीर्थानंद रावने अभिषेक बच्चनसोबत दोन दिवस एक चित्रपट शूट केला, जो साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.