Join us

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:40 IST

Sawalyanchi Janu Savali : 'सावळ्याची जणू सावली' मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'सावळ्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Savali) मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. आता मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत सारंगच्या आणि सावलीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंब साडीच्या दुकानात जातात. साऱंग एक सुंदर साडी निवडतो, जी शेवटी सावलीपर्यंत पोहोचते. 

सारंग आणि सावलीच्या कुटुंबांनी हळदीचा समारंभ आयोजित केला आहे. अलका गुपचूप सारंगच्या हळदीला सावलीच्या हळदीसोबत बदलते, आणि ती उष्टी हळद सावलीपर्यंत पोहोचते. सावलीला हळद लागत असताना भैरवी अस्वस्थ आहे. आणि हळदीत गोंधळ घालण्याचा प्रयत्नात आहे. पण जगन्नाथ आणि अलका ही परिस्थिती हाताळतात. सवालीला हळदीत नटलेलं पाहून अलकाला तिच्या मुलीची आठवण येते, आणि ती भावुक होते. जगन्नाथ तिचं सांत्वन करतो. सारंगच्या घरी संगीत समारंभादरम्यान भैरवी सावलीला गाणं गाण्यासाठी आमंत्रित करते. परंतु, सावलीच्या घरी हळदी समारंभ सुरू असल्याने घरचे तिला गावाच्या हद्दीतून बाहेर जाण्यास मनाई करतात. तरीही, दिलेला शब्द पाळण्यासाठी सावली सर्व आव्हानं स्विकारून साऱंगच्या घरी गाण्यासाठी जाते. 

आता लग्नाच्या आदल्या दिवशी, जगन्नाथ त्याचा अंतिम डाव उघड करणार आहे. तर इकडे सारंगच्या घरी लग्नाच्या पूर्वसंध्येला तिलोत्तमाला काही वाईट संकेत आणि अपशकुन असल्याचं जाणवतात. नियतीने काय लिहलं आहे सारंग आणि सावलीच्या नशीबात ? जगन्नाथने रचलेला कट यशस्वी होईल का? यासाठी 'सावळ्याची जणू सावली' मालिका पाहणे कमालीचे ठरणार आहे.