Join us

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरातील सदस्य जाणार पाताळलोकात शोधायला सोन्याची नाणी, कोण कोणावर पडणार भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:09 IST

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात कधी काय राडा होईल सांगता येत नाही. आज घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi 5 ) पहिल्या दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. सुरूवातीपासूनच घरात दोन गट पाहायला मिळाले. कोणामध्ये मैत्री तर कोणामध्ये प्रेम फुलताना दिसले. एवढंच नाही तर शाब्दिक वादही पाहायला मिळाले. त्यामुळे बिग बॉसच्या घरात कधी काय राडा होईल सांगता येत नाही. आज घरातील सर्व मंडळी पातळलोकात सोन्याची नाणी शोधायला जाणार आहेत. यात कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. टीम A विरुद्ध टीम B असा हा टास्क पार पडणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरात आज कमाल टास्क पार पडणार आहे. प्रोमोमध्ये सांगितले जात आहे की,"पाताळलोकात सदस्यांना शोधावी लागणार सोन्याची नाणी". दरम्यान टास्कमध्ये अरबाज आर्याला म्हणतोय की,"आर्या आपले कमी आहेत..लवकर नाणी आण". दरम्यान कॅप्टन निक्की मात्र टीम B ची नाणी वैध नाही असं म्हणते. यावर डीपी दादा म्हणतात,"खायला अन्न मिळणार आहे त्या करन्सीवर". तर अभिजीत म्हणतो,"यापुढे मला पार्टनर बनयाचं नाही". 

अभिजीतच्या या निर्णयावर घरातील इतर सदस्य त्याचं कौतुक करत त्याला सॅल्युट देताना दिसून येतात. अभिजीत आणि निक्कीची एक जोडी होती. पण आता अभिजीतला निक्कीचा खेळ पटत नसल्यामुळे त्याने तिला सोडले असल्याचा अंदाज बांधला जात आहे.  सोन्याची नाणी शोधण्याच्या टास्कमध्ये कोणती जोडी बाजी मारणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी