Join us  

'आई कुठे..' च्या सेटवर चालू शूटींगमध्ये आलं माकड, मिलिंद गवळींनी दाखवला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 11:04 AM

आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर माकड आल्याची गमतीशीर घटना समोर आली आहे (aai kuthe kay karte)

'आई कुठे काय करते' मालिका ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत सध्या आगळावेगळा ट्रॅक सुरु आहे. ज्याची चांगलीच  चर्चा रंगलीय. सध्या मालिकेत 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' ही स्पर्धा रंगलीय. या स्पर्धेत अनिरुद्ध-संजना तर दुसऱ्या बाजूला अरुंधती-मिहिर स्पर्धा जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसताना दिसत आहेत. अशातच या ट्रॅकचं शूटींग सुरु असताना मालिकेच्या सेटवर माकड आल्याचं पाहायला मिळतं.

'आई कुठे काय करते'च्या सेटवर माकडाची एन्ट्री

'आई कुठे काय करते' मालिकेत सध्या 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' ही स्पर्धा सुरु आहे. मिलिंद गवळींनी याच स्पर्धेच्या शूटींगचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात दिसतं की मिलिंद गवळी ऑन कॅमेरा शूटींग करत असतात. तोच सेटवरच्या छतावरुन माकडाची एन्ट्री होते. त्यामुळे मालिकेचं शूटींग काही वेळ थांबवलं जातं. माकड दबक्या पावलांनी येताना दिसतो.  'आई कुठे काय करते' मालिकेचा हा गमतीशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

'आई कुठे काय करते' मालिकेचा नवीन ट्रॅक

'आई कुठे काय करते' मालिकेत मिलिंद गवळी 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' या स्पर्धेसाठी कूकींग करताना दिसणार आहेत. मिलिंद गवळी याविषयी लिहितात, "आता बहुतेक माझ्या आयुष्यातला एक वेगळे वळण मिळणारे आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बहुतेक cooking, किंवा अन्नदान, world cuisine , किंवा Tasty but still healthy food.आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाळतो त्याच गोष्टी कदाचित आपल्याला भविष्यामध्ये कराव्या लागत असाव्यात. एका वेगळ्या प्रवासासाठी, अनुभवासाठी मी तयार आहे." या शब्दात मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकामाकड