Join us

मराठीतल्या लोकप्रिय जोडीने फॉलो केला मधुमास ट्रेंड; पाहा स्वाती-तुषार देवलचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:11 IST

Marathi celebrity couple: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत स्वातीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण फॉलो करताना दिसून येतो. यामध्येच सध्या गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्र शाहीर' या आगामी सिनेमातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. अनेकांनी या गाण्यावर सुंदर रिल्स केले. मात्र, अभिनेत्री स्वाती देवल आणि तुषार देवल या जोडीने हटके रिल्स केल्याचं पाहायला मिळालं.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन स्वाती विशेष चर्चिली गेली. तर, तुषार देवल 'चला हवा येऊ द्या या' शोच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मराठीतली ही सेलिब्रिटी जोडी कलाविश्वासह सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ते अनेकदा त्यांचे मजेशीर रिल्स, व्हिडीओ शेअर  करत असतात. यावेळी त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

'तुमचं माहीत नाही. आमच्याकडे मधुमास असा बहरलाय..', असं कॅप्शन देत स्वातीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत त्यांचा लहान मुलगादेखील दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या जोडीचा हा व्हिडीओ विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. आतापर्यंत अनेकांनी या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो केल्या होत्या. मात्र, स्वातीने हटके स्टाइल करत नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनचला हवा येऊ द्या