देशातील सर्वात मोठा कुकिंग रिअॅलिटी शो मास्टर शेफ इंडिया ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिववर पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मास्टर शेफचा यंदाचा हा दुसरा सीझन असेल. मास्टरशेफ इंडिया हा सर्वात प्रतिष्ठित कूकिंग रिअॅलिटी शो आगामी सीझनमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्तम कूकिंग कौशल्य असलेल्या प्रतिभावान व्यक्तींचा शोध घेत आहे. विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यंदाच्या सीझनमध्येही परिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
तुमच्यामध्ये सर्जनशीलता, टेक्निक आणि प्रेझेन्टेशनसह आमच्या तज्ञ परीक्षकांच्या पॅनेलला प्रभावित करण्याची क्षमता असेल तर ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही होम कूक असा किंवा किचनमध्ये प्रयोग करण्याची आवड असणारी व्यक्ती असाल, मास्टरशेफ इंडिया तुमच्या फूडप्रती आवडीसह स्वागत करत आहे. तर मग, काहीतरी असाधारण अनुभव घेण्यास आणि पाककला विश्वामध्ये स्वत:ची छाप पाडण्यास सज्ज राहा!
शोसाठी ऑडिशन्सची सुरूवात उत्साहपूर्ण शहर कोलकातापासून होईल, त्यानंतर दिल्ली व मुंबईमध्ये ऑडिशन्स घेण्यात येतील. १३ ऑगस्ट, १६ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी ऑडिशन्स होणार आहेत. मुंबई ऑडिशन्सना १९ ऑगस्ट रोजी रायन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई), वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाइन नगर, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४ येथे सुरूवात होईल. मल्टी-सिटी ऑडिशननंतर शोमध्ये देशभरातील होम कूक्सदरम्यान उत्साहपूर्ण शोडाऊन पाहायला मिळेल. तर मग, मंच सज्ज आहे आणि परीक्षक मास्टरशेफ इंडियाच्या शर्यतीत सहभाग घेण्यासाठी उत्साही व प्रतिभावान पाककला प्रेमीचं स्वागत करत आहेत.