सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका दाखल होत आहे. १७ जूनपासून स्टार प्रवाहवर नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं (Thoda Tuza Thoda Maza ) ही मालिका दाखल होत आहे. देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) यांची जोडी या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे.
तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे फारच उत्सुक आहे. ती सांगते की, स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.
थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका १७ जूनपासून भेटीलास्टार प्रवाह प्रस्तुत थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.