Join us

खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा होणार झी मराठी अवॉर्ड्स २०२२"चं प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 13:47 IST

झी मराठी अवॉर्ड्स सोहळा यावर्षी देखील अतिशय दिमाखदार पद्धतीने मोठ्या थाटामाटात पार पडला.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी अवॉर्ड्स प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. यंदा नवा गडी नवं राज्य, माझी तुझी रेशीमगाठ, अप्पी आमची कलेक्टर, दार उघड बये, तू चाल पुढं, सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळाली.

यंदाच्या पुरस्कारांचे खास म्हणजे सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांच्यात लागलेली टशन." #लागली पैज" म्हणत दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते.  त्यामुळे खास लोकाग्रहास्तव झी मराठीवर हा सोहोळा पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.  ‘झी मराठी अवॉर्ड’ रविवार २३ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता. 

टॅग्स :झी मराठी