Join us  

'बिग बॉस मराठी'च्या घरात चोरी! सूरजला मिळाला 'गुलीगत धोका', रीलस्टारचे ३० हजार गेले चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 1:07 PM

Bigg Boss Marathi Season 5 :'बिग बॉस मराठी'च्या घरात नवीन सीझनने नवा ट्विस्ट घेतला आहे. घरात सध्या दोन गट पडले आहेत. नुकत्याच आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतं आहे की, बिग बॉसच्या घरात चोरी झाली आहे.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi 5)च्या नव्या सीझनमधील पहिला आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवला. पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. आता दुसऱ्या आठवड्यातही १५ सदस्यांची 'कल्लाकारी' प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या आठवड्यात जे सदस्य शांत होते ते सदस्य कदाचित दुसऱ्या आठवड्यात भिडताना दिसून येतील. दरम्यान 'बिग बॉस मराठी'च्या घरात नवीन सीझनने नवा ट्विस्ट घेतला आहे. घरात सध्या दोन गट पडले आहेत. नुकत्याच आलेल्या प्रोमोत पाहायला मिळतं आहे की, बिग बॉसच्या घरात चोरी झाली आहे. 

समोर आलेल्या प्रोमोत दिसतंय की, रात्री सूरजच्या झोपेचा फायदा घेत अरबाजने सूरजची ३०,००० रुपयाची बीबी करन्सी चोरून आपल्या प्रोटीन पावडरच्या डब्यात ठेवलेली दिसत आहे. या घटनेने  घरातील वातावरण कसे होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. सूरजला आता कधी आणि कसे कळणार..आणि बिग बॉस आता पुढे अरबाजला काय शिक्षा देणार ? हे देखील पाहणे रंजक ठरेल.

 

जान्हवी आणि सूरजमध्ये होणार भांडण'बिग बॉस मराठी'च्या एका प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आणि गोलीगत सूरज चव्हाण भांडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये जान्हवी म्हणतेय, "तुला काल काय चावी मिळाली का? आठवडाभर तर शांतच होतास ना. माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही". त्यावर गोलीगत सूरज जान्हवीला म्हणतो,"तू निघ... चल फूट". गोलीगत सूरज चव्हाण पहिल्या आठवड्यात खूपच शांत होता. पण आता हळूहळू तो आपले खरे रंग दाखवताना दिसून येईल.

टॅग्स :बिग बॉस मराठी