बिग बॉस मराठीमधून सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर अंकिता प्रभू वालावलकर (ankita walawalkar) घराघरात पोहचली. १६ फेब्रुवारी रोजी अंकिताने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ते दोघे गुढीपाडवा सण साजरा करणार आहेत. या निमित्ताने अंकिता आणि कुणालने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या दोघांनी हटके उखाणादेखील घेतला.
कुणाल भगत उखाणा घेताना म्हणाला की, मनी माझ्या आहे सुखी संसाराची आस, अंकिता तू फक्त प्रेमानी हास. तर अंकिताला कुणालचा उखाणा खूप आवडला. त्यानंतर तिने उखाणा घेतला. ती म्हणाली की, एका वर्षात महिने असतात बारा, कुणालमुळे वाढला आनंद सारा.
या ठिकाणी झाली पहिली भेट
या मुलाखतीत अंकिता आणि कुणालने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. त्यांच्या नात्याची सुरूवात इंस्टाग्रामपासून झाली. कुणाल अंकिताला इंस्टाग्रामवर मेसेज करायचा. तो तिच्यासोबत फ्लर्ट करायचा. त्यावेळी अंकिताने त्याला खूप इग्नोर केलं होतं. मग हळूहळू त्यांचं इंस्टाग्रामवरुन बोलणं सुरू झालं. मग त्यांची भेट झी मराठी पुरस्कार सोहळ्यात झाली.
कुणालने अशी दिली प्रेमाची कबुली
पहिल्यांदा प्रपोझ कधी केलं, यावर अंकिता म्हणाली की, आम्ही प्रॉपर पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तो मला म्हणाला की, आपण एकदा भेटूयात. जरी आमची पहिली भेट पुरस्कार सोहळ्यात झाली पण तेव्हा आम्ही फक्त हाय हॅलो केलं होतं. पहिल्यांदा प्रॉपर भेटून छान बोलूयात असं ठरलं तेव्हाच त्याने मला प्रपोझ केलं. त्यानंतर कुणाल म्हणाला की, पहिल्या भेटीतच मी तिला सांगून टाकलं. लग्न नंतर करुया असं नाही म्हटलं. पण ती आवडत असल्याचे सांगितले. ही आमची ऑफिशिएल पहिली भेट होती.