छोट्या पडद्यावरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मधील दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी) हा आज मालिका विश्वात सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे. त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ढेरपोट्या, मजेशीर केशभूषा ते त्याचा लोकप्रिय संवाद 'न्योछावर कर दो'पर्यंत त्याने त्याची विनोदीशैली व अभिनय क्षमतांसह छाप पाडली आहे. पण अनेकांना माहित नाही की विनोद व हावभावांचा बादशहा ची-ची म्हणजेच गोविंदा यांच्यासोबत त्याचे विलक्षण साम्य आहे.
होय, योगेशची सह-कलाकार आणि मालिकेमधील दबंग दुल्हनिया राजेश ऊर्फ कामना पाठक म्हणाली, ''योगेश हा मी आतापर्यंत काम केलेल्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्याचे हावभाव अद्वितीय आहेत. मी त्याला पाहते, तेव्हा मला गोविंदाजींची आठवण येते. त्याचे त्यांच्यासोबत विलक्षण साम्य आहे. त्याच्या हावभावांमधील बदल, त्याच्या नजरेतून होणारा अभिनय, हास्य मला ची-ची आठवतात.
अनेक हावभाव व्यक्त करणे किंवा इतके प्रभावी असणे सोपे नाही. पण योगेश ते अगदी सुलभतेने करतो. त्याची अभिनय सादर करण्याची अनोखी पद्धत आहे. त्याचे हावभाव अगदी गोविंदासारखे आहेत. आणि मी ही गोष्ट योगेशला सांगितली, जेव्हा त्याचा आनंदात गगनात मावेनासा झाला. त्याला असे वाटले की, मी त्याला जीवनातील मोठा आनंद दिला.''
कामना यांच्या कौतुकास्पद शब्दांना प्रतिक्रिया देत योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाल, ''ज्यांना पाहून अभिनय शिकलात, ज्यांच्याकडून रोज प्रेरणा घेता, त्यांच्याशी तुमची तुलना करण्यात आली तर यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही.
मी गोविंदाजींना पाहत मोठा झालो आहे आणि ते माझे मोठे प्रेरणास्रोत आहेत. मी त्यांचे अनुकरण करत अभिनयाला सुरूवात केली. यामुळे माझ्या आतील कलाकार निपुणपणे जगासमोर आला. मला आठवते, कामना म्हणाली होती की माझा अभिनय गोविंदाजींसारखा आहे, मला खूपच सन्माननीय वाटले. त्यामुळे मला खूप आनंद झाला. जर लोकांना माझ्यामध्ये त्यांची झलक पाहायला मिळत असेल, तर माझ्यासाठी हे सर्वात मोठे कौतुक आहे.''