'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) 'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5 ) मधून घराघरात लोकप्रिय झाली. सध्या तिची लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती मराठी मनोरंजन विश्वातील संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्न करणार आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
अंकिता वालावलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यात काही फोटो शेतातील आहेत. तसेच पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. एका फोटोत अक्कलकोटमध्ये लोकांना जेवण वाढताना दिसले. तिने फोटो शेअर करत लिहिले की, काल स्वामींच दर्शन घेऊन आलो.. मनात खूप गोष्टी होत्या..सतत वाटायचं की खोटं वगणाऱ्यांसोबत चांगलं का होतं? आपण खरं वागुन चुकीचे का वाटतो? आपल्याला मुद्दाम चुकीच का दाखवलं गेलं? पण अक्कलकोट हे एक अस स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात.. एक कायम लक्षात ठेवा “कर्माच्या हिशोबात उशीर होतो,चुक होत नाही,बाकी तो बघता,तेचो लक्ष आसा”. कुणाल भगत तु माझ्या कर्माचं एक फळ.