Join us

कलाकारांत बाकी काही नाही , फक्त...; संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 14:08 IST

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय जी चर्चेत आहे (Sankarshan Karhade)

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षण सध्या मालिका, वेबसिरीज, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमांत कार्यरत आहे. याशिवाय संकर्षण कोणत्याही माध्यमात अभिनय करत असला, तरीही त्याने नाटकाची साथ सोडली नाहीय. संकर्षण सोशल मीडियावर त्याच्या आयुष्याबद्दल विविध अपडेट्स शेअर करत असतो. संकर्षणने नुकतीच एक पोस्ट लिहीलीय जी चर्चेत आहे.

संकर्षणने रंगभूमीला नमस्कार करतानाचा फोटो शेअर करुन लिहीलंय की, "तू म्हणशील तसं आज प्रयोग क्र. ३५०* काशीनाथ घाणेकर, ठाण्यात ! लिहिलेलं पहिलं व्यावसायीक नाटक.. पहिलं बाळ .. खूप प्रेम आहे माझं ह्या नाटकावर ….! मला खूप वेगवेगळा अनुभव पदरात पडला.. निर्मात्याची भक्कम साथ, दिग्दर्शकाचं योग्यं व्हिजन, योग्यं सहकलाकारांची सुयोग्य साथ, प्रत्येक प्रयोग करतांना “आजचा पहिलाच आहे” ह्या भावनेने, मन लाउन प्रयोग करायची उर्जा…. ईच्छा …… आणि प्रेक्षकांची साथ."

संकर्षण पुढे लिहीतो,  "वाह …. ! मज्जा आली .. येत राहाणार …. नाटक मज्जा आहे .. नाटक “आ नं द” आहे …. नाटकासारखं सुख नाही… नाटकाईतकं जिवंत काही नाही ….शरिरात आहे नाहीत त्या जाणीवांसह , मंचावर ऊभं रहावं …. खूप आलं तरी शुन्यातून सुरवात करायची असेल , तर नाटक करावं …. कलाकारांत बाकी काही नाही , फक्तं नाटक उरावं."

टॅग्स :मराठीनाटक