Join us

किंशुक महाजन म्‍हणतो, "अलौकिक शैलीमध्‍ये प्रयोग करण्‍यासाठी बराच वाव आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 10:23 AM

या मालिका काल्‍पनिक असतात आणि कलाकारांना त्‍यांच्‍या अभिनय कौशल्‍याला आव्‍हान देण्‍याची संधी देतात, असे लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता किंशुक महाजनचे मत आहे.

छोट्या पडद्यावर सध्‍या विविध अलौकिक शक्‍तीसंदर्भातील मालिकांचा भरणा आहे आणि या मालिकांमधून विविध प्रकारच्‍या भूमिका सादर केल्‍या जात आहेत. या मालिकांनी अल्‍पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. प्रेक्षकांना देखील या मालिका आवडत आहेत आणि अलौकिक शैली कलाकारांची देखील आवडती बनली आहे. या मालिका काल्‍पनिक असतात आणि कलाकारांना त्‍यांच्‍या अभिनय कौशल्‍याला आव्‍हान देण्‍याची संधी देतात, असे लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता किंशुक महाजनचे मत आहे. हा अभिनेता लवकरच मालिका 'लाल इश्‍क'मधील एका एपिसोडमध्‍ये दिसणार आहे. याअगोदर अलौकिक शैलीच्‍या तीन मालिकांमध्‍ये काम केलेल्‍या किंशुकला या शैलीबद्दल विशेष आवड निर्माण झाल्‍यासारखे वाटते. किंशुक म्‍हणतो, ''मी हॉरर आणि अलौकिक शक्‍तीच्‍या शैलीकडे माझी ओढ वाढली आहे.  ही शैली विविध भूमिकांसह प्रयोग करण्‍यास बराच वाव देते. विविध प्रकारच्‍या भूमिका साकारणे आव्‍हानात्‍मक असले तरी त्‍यामधून रोमांचक अनुभव मिळतो.''

किंशुक पुढे म्‍हणाला, ''माझ्या मते पडद्यावर अलौकिक शैलीच्‍या भूमिकेमध्‍ये जिवंतपणा आणण्‍यासाठी ग्राफिक्‍स व व्‍हीएफएक्‍सवर अधिक विसंबून रहावे लागते. पण भूमिकेच्‍या रूपामध्‍ये अलौकिक शक्‍तीसंदर्भातील जाणीव आणण्‍यासाठी प्रोस्‍थ्‍ोटिक्‍स आणि मेकअपचा देखील उपयोग करावा लागतो. मालिका 'लाल इश्‍क'मध्‍ये सर्व भूमिकांसाठी प्रोस्‍थेटिक्‍स अधिक प्रमाणात वापरले जातात. यामधूनच भूमिकेतील अस्‍सलपणा सादर केला जातो असे मला वाटते.''  

आगामी एपिसोडमध्‍ये किंशुक महाजन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तो हर्षवर्धन या शाही राजकुमारच्‍या भूमिकेत दिसणार आहे. हा राजकुमार सुयशचा पणजोबा असतो. किंशुकनेच सुयशची भूमिका साकारली आहे. सुयश त्‍याच्‍या पणजोबाने गतकाळात केलेल्‍या चुकांमुळे वर्तमान स्थितीमध्‍ये त्‍याच्‍या गरोदर पत्‍नीचे संरक्षण करत आहे.