Join us

... म्हणून एल्विश यादवच्या जामीनवर आजही सुनावणी नाही; ४ दिवसांपासून कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 1:38 PM

रेव्ह पार्टी विष प्रकरणाता एल्विशला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आली आहे

बिग बॉस विजेता एल्विश यादव गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी एल्विश आल्यामुळे तो राजकीय वर्तुळात चर्चेत आला होता 'बिग बॉस ओटीटी २' विजेता आणि युट्यूबर एल्विश रेव्ह पार्टी प्रकरणामुळेही चर्चेत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला रविवारी(१७ मार्च) अटक केली होती. त्यानंतर एल्विशने पार्टीत सापाचं विष पुरवलं असल्याची कबुली दिली होती. मात्र, याप्रकरणी अद्यापही एल्विशच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे, गेल्या ३ दिवसांपासून तो तुरुंगातच असून आज ४ था दिवस आहे. 

रेव्ह पार्टी विष प्रकरणाता एल्विशला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आली आहे. एल्विशच्या अटकेनंतर त्याच्या आईवडिलांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. एल्विशला पोलिसांनी फक्त चौकशीसाठी बोलवलं होतं. पण, अचानक त्याला अटक करण्यात आली, असं युट्यूबरच्या वडिलांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती. तसेच, एल्विश निर्दोष असल्याचं सांगत त्यांनी भाजपा खासदार मनेका गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. एल्विशने गुन्ह्याची कबुली दिल्याच्या माहितीलाही त्यांनी चुकीचं म्हटलं. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी एल्विशला कोर्टात हजर केले असता, न्यायालायने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

एल्विश यादवला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे, एल्विशच्यावतीने त्याचे वकील जामीनासाठी अर्ज करु शकतात. मात्र, छत्तीसगडच्या सुरजपूर न्यायालयातील सर्वच वकिलांनी संप पुकारला आहे. आज बुधवारी त्यांच्या संपाचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे, एल्विशच्या अटकेपासून आजपर्यंत जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे, आज चौथ्या दिवशीही एल्विशला रात्री कोठडीतच काढावी लागणार आहे. उद्या कदाचित वकिलांनी संप मागे घेतल्यानंतर एल्विशच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :गुन्हेगारीबिग बॉसटिव्ही कलाकारन्यायालय