या कलाकरांना वाटते ऑन एंड ऑफस्क्रीन महिलाच राज्य करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:27 AM
मालिकांनी नेहमीच महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सक्षमतेसाठी समर्थन केले आहेत.सक्षम महिलांच्या कथा लक्षवेधक निवेदनातून सादर केलेल्या आहेत.या यादीत 'उडान','लाडो-वीरपूर ...
मालिकांनी नेहमीच महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सक्षमतेसाठी समर्थन केले आहेत.सक्षम महिलांच्या कथा लक्षवेधक निवेदनातून सादर केलेल्या आहेत.या यादीत 'उडान','लाडो-वीरपूर की मर्दानी' आणि 'शक्ती' या शो पासून ते 'पिंकेथॉन'मधून महिलांच्या यशोगाथा छोट्या पडद्यावर प्रसारित करत महिलांना सक्षम करण्यासाठी सुद्धा काम करत आहे.मालिकांमुळे समाजात एक सकारात्मक बदल आणण्याची ताकद आहे.नेहमीच्या जीवनात सुध्दा कलर्सच्या प्रमुख अभिनेत्री नेहमीच्या जीवनात सुद्धा महिला सक्षमीकरण करण्याची इच्छा बाळगताना आणि त्याचा उत्सव साजरा करताना दिसत आहेत.कलर्सच्या उडान मध्ये सूरजची प्रमुख भूमिका साकारणारे विजयेंद्र कुमेरिया, दररोज, त्यांच्या फक्त दीड वर्षांच्या मुलीला किमयाला सोबत घेऊनच नाश्ता करतात. ती तिच्या बाबांना सोबत करते आणि त्यांच्या सोबत गाडीपर्यंत जाते आणि ते कामावर जाई पर्यंत तेथे थांबते. याविषयी तो सांगतो,“आमच्या जीवनात माझी मुलगी आल्यापासून माझे जीवन अतिसय सुंदर झाले आहे. ती माझ्यासाठी खूप लकी आहे.आम्ही नाश्ता करतानाच मी तिच्या सोबत वेळ घालवू शकतो आणि म्हणून मी ती वेळ कधीच चुकवत नाही.” पॅक अप नंतर ते घाईघाईने घरी पळत जातात की त्यामुळे त्यांना मुलगी झोपण्याआधी तिला भेटायचे असते.त्यांनी कबूल केले की मुलगी जीवनात आल्यामुळे त्यांचे आयुष्य अतिशय चांगले झाले आहे. उडान या शो मध्ये सुद्धा महिला सक्षमहोण्याची गरज आणि त्यांचे हक्क त्यांना देण्याचे विचार दाखविलेले आहेत.'लाडो-वीरपूर की मर्दानी' मध्ये डॉ. विशालची भूमिका साकारणाऱ्या अध्विक महाजन ने सांगीतले की त्यांची पत्नी एक यशस्वी स्टायलिस्ट आहे आणि तो सांगतो की,“माझी पत्नी ही माझ्या जीवनातील सर्वात महत्वाची महिला आहे.अतिशय परिश्रम करून इंडस्ट्री मध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.आज ती एक प्रसिद्धा स्टायलिस्ट, मनोरंजनाच्या इंडस्ट्रीतील सर्वोच्च सेलिब्रिटींची फॅशनिस्ट बनली आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. नेहा महाजनचा पती अशी ओळख मला अतिशय आवडते”. त्यांनी पुढे सांगीतले,“आमच्या जीवनात येणाऱ्या महिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या वर प्रेम करणे आवश्यक आहे.” अध्विक त्याच्या पत्नीसाठी नेहमीच विशेष सरप्राईज प्लॅन करत असतो.यंदा तो व्हॅकेशनसाठी पत्नीला अंदमानला जाणार असल्याचेही त्याने सांगितले. तसेच खास तिच्या साठी जेवण बनवणार असल्याचे त्याने सांगितले.'लाडो-वीरपूर की मर्दानी'मालिकेतील युवराज ऊर्फ शालीन मल्होत्राने सांगीतले, “जेव्हा आपण महिला सक्षमीकरण म्हणतो तेव्हा आपण समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतो की महिला अजूनही कमी सक्षम आहेत.माझा विश्वास आहे की महिला अतिशय उत्कृष्ट असतात आणि त्या नेहमीच सक्षम असतात. त्यांच्या मध्ये प्रेम, काळजी घेणे, कठोर परिश्रम आणि ममत्वने महिला संपूर्ण असते. त्या खूपच स्ट्राँग असतात. मला लोकांनी वर्षातून एकाच दिवशी या मुद्द्यावर बोललेले आणि नंतर विसरून गेलेले आवडत नाही. मला लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा आणि त्याचा अनुभव घ्यावा आणि त्यांच्या जीवनातील महिलांनाही आदर द्यावा असे वाटते.”