छोट्या पडद्यावरील इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) हा रिअॅलिटी शो आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय सीझन ठरला. या सीझनमधील प्रत्येक स्पर्धक त्यांच्या दमदार परफॉर्मेन्समुळे चर्चेत राहिला. तर, काही स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आले. यातलंच एक नाव म्हणजे अरुणिता कांजीलाल (arunita kanjilal). प्रोफेशनल लाइफसोबतच अरुणिता, पवनदीप राजनसोबत (pawandeep rajan) असलेल्या मैत्रीमुळे चर्चेत राहिली. या शोनंतर अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं नातं काय? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. तर, काहींनी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं. परंतु, पवनदीपपेक्षाही दोन व्यक्ती अरुणितासाठी अत्यंत खास आहेत.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अरुणिता कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही क्षणही चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने तिच्या त्रिकोणी कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचे आई-वडील दिसून येत आहेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनवरुन तिचं तिच्या कुटुंबावर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
दरम्यान, अरुणिता तिच्या उत्तम आवाजासह सौंदर्यामुळेही कायम चर्चेत असते. अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होतात. तिच्या प्रत्येक पोस्टला नेटकरी भरभरुन प्रतिसाद देत असतात. त्यामुळे सध्याच्या घडीला अरुणिता लोकप्रिय गायिका असण्यासोबतच सोशल मीडिया सेन्सेशनदेखील आहे.