Join us

‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमध्ये घडणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 3:26 AM

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमुळे रविवार महारविवार साजरा होणार आहे. या दोन्ही ...

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमुळे रविवार महारविवार साजरा होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये मदर्स डे साजरा केला जाणार असल्याने हे दोन्ही महाएपिसोड खास असतील.'नकळत सारे घडले'मध्ये अपघाताला सामोरं जावं लागलेल्या आपल्या आईला न्याय मिळवून द्यायचा नेहा प्रयत्न करतेय. या अपघाताला प्रिन्स दोषी आहे असं नेहाला वाटतंय. तिकडे आईसाहेब आणि प्रताप प्रिन्सला वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्रिन्सला शिक्षा करण्याच्या या लढ्यात नेहा यशस्वी ठरते का? प्रताप नेहाच्या पाठीशी उभा राहणार का? प्रिन्सने खरंच हा अपघात घडवून आणलाय का? हे सगळं  महाएपिसोडमध्ये कळणार आहे. तसंच 'लेक माझी लाडकी' या मालिकेत मीरा सध्या मानसिक तणावातून जात आहे. ऋषिकेश मीराचा खूप छळ करत आहे. या सगळ्याला कंटाळून मीरा त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करते आणि ऋषिकेशला अटक होते. त्यानंतर सहा महिन्यांनी मीरावर अचानक विषप्रयोग केला जातो. हा विषप्रयोग कोण करतं? त्याचा हेतू काय असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत. या शिवाय, १३ मे मदर्स डे म्हणून साजरा केला जाणार असल्याने या दोन्ही मालिकांच्या महाएपिसोडमध्ये मदर्स डेचं सेलिब्रेशनही होणार आहे. हे सेलिब्रेशन म्हणजे सरप्राईज आहे. नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडणार आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीचत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे तर लेक माझी ला़डकी या मालिकेत ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, अविनाश देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. Also Read : नकळत सारे घडले या मालिकेतील परीची १०० मुलांच्या ऑडिशनमधून झाली निवड