स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Munawar Farooqui)ने सलमान खान(Salman Khan)चा रिॲलिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) जिंकला आहे. परंतु अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि आयशा खान (Ayesha Khan) या खऱ्या विजेत्या म्हणून उदयास आल्या आहेत. अशी माहिती मिळते आहे की अंकिता लोखंडे आणि आयशा खान बिग बॉस शोच्या विजेत्या बनू शकल्या नसल्या तरी त्यांच्या हातात एक मोठा चित्रपट आला आहे.
आयशा 'बिग बॉस १७' मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती. तिने शोमध्ये येऊन खुलासा केला की ती मुनाव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आहे. अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत शोमध्ये प्रवेश केला होता. ती पहिल्या दिवसापासून शोमध्ये होती. आता या दोन्ही अभिनेत्रींबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुकेश छाब्राने केलं ट्विटबॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबराने अंकिता लोखंडे आणि आयशा खान यांना घेऊन चित्रपट बनवण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे. खुद्द मुकेश छाबरा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर (ट्विटर) याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'चित्रपटात अंकिता लोखंडे आणि आयशा खानला कास्ट करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही'.
अंकिताचे चाहते आहेत खूप खूश
'गँग्स ऑफ वासेपूर', 'काई पोचे', 'शाहिद', 'बरेली की बर्फी' व्यतिरिक्त मुकेश छाबरा सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'साठी प्रसिद्ध आहे. मात्र, दिग्दर्शकाने अद्याप आपल्या चित्रपटाचे टायटल जाहीर केलेले नाही. अंकिता लोखंडे आणि आयशा खान या शोमध्ये यशस्वी होऊ शकल्या नसल्या तरी आता या दोघांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आहेत, हे आता त्याच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. दिग्दर्शकाच्या या पोस्टमुळे अंकिताचे चाहते खूप खूश आहेत.