Join us

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूचा बोल्ड अवतार; ज्ञानदा रामतीर्थकरचे फोटो पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:30 IST

Dnyanada ramtirthkar: ज्ञानदाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत.

छोट्या पडद्यावर अशा काही मालिका होऊन गेल्या आहेत ज्या संपल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी'. उत्तम कथानक आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली.  ही मालिका संपून आता बरेच महिने झाले आहेत. मात्र, त्यातील कलाकार सातत्याने चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील अप्पूची चर्चा रंगली आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada ramtirthkar)  हिने अप्पू ही मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून ती बरीच लोकप्रिय झाली. त्यामुळे सोशल मीडियावर वरचेवर तिची चर्चा रंगत असते. ज्ञानदाने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत.

ज्ञानदा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ज्ञानदा कमालीची बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

दरम्यान, ज्ञानदाचा हा बोल्ड अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, तिचं हे नवं रुप चाहत्यांना चांगलंच आवडलं आहे. त्यामुळे चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण तिच्या या लूकवर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी