अखेर प्रतीक्षा संपली! 'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन या तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:36 PM2021-08-26T20:36:36+5:302021-08-26T20:38:11+5:30

बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत

The third season of 'Bigg Boss' is coming to the audience on this date | अखेर प्रतीक्षा संपली! 'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन या तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर प्रतीक्षा संपली! 'बिग बॉस' मराठीचा तिसरा सीझन या तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून १९ सप्टेंबरला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टीझर लॉंच झाला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग तो बिग बॉसचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती - यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता हे  घर सज्ज झाले आहे मनोरंजन करण्यासाठी... १९ सप्टेंबरपासून बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन भेटीला येतो आहे. बिगबॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असून त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले. 

 
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत या कार्यक्रमाच्या नव्या सिझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते सेलिब्रेटी जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. तेव्हा लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य, कसे असणार यावेळेसचं घरं ! शुभारंभ १९ सप्टेंबरपासून संध्या ७.०० वा. आणि दररोज रात्री ९.३० वा. !

Web Title: The third season of 'Bigg Boss' is coming to the audience on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.