झी मराठीवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa ) ही मालिका आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. एकत्र कुटुंब, या कुटुंबीयांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी अशा अंगाने जाणारी ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आलीये. याआधी ही मालिका मोठ्याबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंजली जोशी ( Anjali Joshi) यांनी ही मालिका सोडली यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने ही मालिका सोडली असल्याचे कळतंय. मोठ्याबाईंनीनंतर आप्पांनीची भूमिका साकारत असलेल्या प्रशांत गरुड यांनी ही मालिका सोडल्याचे कळतंय. मनोरंजन मराठी ऑफिशियल ही अपडेट दिली आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेमुळे प्रशांत गरुड घराघरात पोहोचले. ही भूमिका त्यांनी अतिशय उत्तम साकारली होती. मात्र आता त्यांनी ही मालिका सोडल्याची माहिती आहे. अर्थात मालिकेच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही अपरिहार्य कारणांमुळे आप्पांनी ही मालिका सोडली असल्याचं कळतंय. प्रशांत यांनी ही मालिका का सोडली, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांची भूमिका आता राजा राणा साकारणार आहेत.
मालिकेत सध्या नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. सिद्धार्थचे अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते हे अदिती मोठ्या बाईंना सांगते आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो. त्या चक्कर येऊन पडतात. मोठ्याबाईंना धक्का बसल्याचा संपूर्ण दोष सिद्धार्थ व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. तिकडे सिद्धार्थही यावरून अदितीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे खोटं होतं, असं बाईंना सांग नाहीतर आपण वेगळं होऊ असे दोन पर्याय तो अदितीसमोर ठेवतो. अदिती पहिला पर्याय निवडते आणि स्वत: वाईटपणा घेत, अमेरिकेला जाण्याचा निर्णय तिचा असल्याचं घरच्यांना भासवते.