Join us

पुरुषप्रधान मानसिकतेला छेद देणारी 'दार उघड बये',शरद पोंक्षेसह हे कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 2:06 PM

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी 19 सप्टेंबरपासून ‘दार उघड बये’ ही मालिका सुरु होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत तू चाल पुढं. अप्पी आमची कलेक्टर अशा नव्या मालिका सुरू झाल्या. लवकरच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीय येतेय.झी मराठीवर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ‘दार उघड बये’ असं या मालिकेचं नाव आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी 19 सप्टेंबरपासून ‘दार उघड बये’ ही मालिका सुरु होणार आहे. 

दार उघड बये या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोशन विचारे या मालिकेचा मुख्य नायक असून सानिया चौधरी मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

या मालिकेची कथा संबळ वाजवून उदरनिर्वाह करत पारंपारिकता जपणाऱ्या कुटुंबात आई वडील दोन मुली एक मुलगा यांच्या भवती आधारित आहे. वडील निष्णात संबळवादक असून शहरातील एका श्रीमंत घरात प्रत्येक नवरात्रात संबळ वाजवण्याचा मान त्यांच्याकडे आहे. कर्जापायी सावकार घर हिसकावू पाहत असताना वडील काही दिवसांची सवलत घेऊन त्या गर्भश्रीमंत घरी नवरात्रीच्या नऊ दिवस वाजवण्यासाठी जातात. त्यांना दम्याचा आजार असल्याने काळजीपोटी मोठी मुलगी मंजिरी सोबत जाते. त्या घरातील मुख्य व्यक्ती रावसाहेब नगरकर पुरुषप्रधान मानसिकतेचा असून घरातील बायांवर नाच गाणे वाजवणे या सर्वांवर बंधणे आहेत. त्याची सावत्र आई चंद्रा तामसगीर होती व तिच्यामुळेच माझी सख्खी आई गेली म्हणून तिला एका घरात बंदिस्त केलेले असते. घट बसतानाच्या पहिल्या आणि महत्वाच्या आरतीला वाजवताना वडिलांना दम्याचा प्रचंड त्रास झाल्याने आरती मध्येच थांबवावी लागते. अनेक वर्षांची परंपरा मोडल्याने चिडून रावसाहेब त्यांना घराबाहेर काढत असताना मंजिरी स्वतः संबळ घेऊन वाजवायला उभी राहते. पुरुषी अहंकार असलेल्या कुटुंबप्रमुखाला स्त्रीने देवीपुढे संबळ वाजवणे प्रचंड त्रास देवून जाते. 

टॅग्स :झी मराठीशरद पोंक्षे