कहानी घर घर की मधील छाया या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली रिंकू धवन ही बिग बॉस १७च्या बोल्ड आणि सुंदर स्पर्धकांपैकी एक आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तिच्या आयुष्यात नेहमीच खूप धाडसी राहिली आहे. एका भूमिकेसाठी तिने केशवपनही केले. रिंकूने तिच्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.
अभिनेत्री रिंकू नेहमीच तिच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. स्टार प्लसच्या प्रसिद्ध शो 'घर घर की कहानी'मध्ये भावा-बहिणीच्या भूमिकेत दिसणारे किरण करमकर आणि रिंकू एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००२ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, १५ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. रिंकू आणि किरण यांना इशान नावाचा मुलगा आहे. रिंकू आणि किरण यांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला आणि दोघेही अनेक वर्षांपासून वेगळे राहत आहेत.
रिंकूला हवाय जोडीदाररिंकूने एकदा सांगितले होते की 'तिला जोडीदार हवा आहे पण तिचे लग्न झालेले आहे. कोणालाच एकटे आयुष्य जगायचे नसते. पण जर तुम्ही मला लग्नाबद्दल विचारले तर, खरे सांगायचे तर मी ते आधीच केले आहे, माझे मित्र मला लग्नाबद्दल पुन्हा विचार करण्यास सांगत आहेत, परंतु योग्य व्यक्ती शोधणे महत्वाचे आहे. एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत बोलताना रिंकू धवन म्हणाली होती की, 'मी त्यामुळे ट्रिगर होत नाही, मी एक अशी व्यक्ती आहे जी सहजासहजी ट्रिगर होत नाही. हे अनेक वर्षांपूर्वी घडले, ही भूतकाळातील गोष्ट आहे.
वर्कफ्रंट...रिंकूने १९९५ मध्ये स्वाभिमान या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तिने दूरदर्शन शोमध्ये नीतू मल्होत्राची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने 'हम पांच'मध्येही फुलनची भूमिका साकारली होती. बिग बॉस १७ फेम रिंकूने २०१५ मध्ये ये वादा रहा या भूमिकेसाठी तिने टक्कलही केले होते. कहानी घर घर की व्यतिरिक्त, रिंकू ना बोले तुम ना मैने कुछ कहा, गुप्ता ब्रदर्स, अप्पनपण आणि तितली सारख्या मालिकेत दिसली आहे. रिंकू धवनने काही बॉलिवूड चित्रपटही केले आहेत. ती २०१७ मध्ये अरमान जैन स्टारर लेकर हम दिवाना दिल आणि २०१९ मध्ये वीरगतीमध्ये दिसली होती. रिंकू धवन बिग बॉस १७ मधील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक आहे.