Join us  

'बिग बॉस मराठी'च्या घरातली 'ही' आहे निक्कीची सोलो पॉलिसी; अभिजीतला दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 3:49 PM

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अनसीन अनदेखामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा कल्लामध्ये निक्की आणि अभिजीत चर्चा करताना दिसत आहेत.

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या घरातील काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत. तर काही सदस्यांमध्ये मात्र चांगलीच मैत्री पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य २४ तास नाट्य करत असतात. आता कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'मधील एपिसोडमध्ये न दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना जिओ सिनेमावरील एक्स्ट्रा कल्लामध्ये पाहायला मिळतील. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अनसीन अनदेखामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा कल्लामध्ये निक्की (Nikki Tamboli) आणि अभिजीत (Abhijeet Sawant) चर्चा करताना दिसत आहेत. 

निक्की म्हणतेय,"तुला माहिती आहे ना जंगलाचा राजा एकटा बसतो आणि बाकीचे प्राणी नेहमी सोबत असतात. कारण ते राजासमोर एकटे जाऊ शकत नाहीत. निसर्गाची ही पॉलिसी आहे. गौतम गुलाटीच्या सीझनमध्ये सगळे जण त्याच्या विरोधात होते. पण तरीही तो त्या सीझनचा विजेता झाला. कारण घरातले सीन लोक त्यांच्या नजरेने पाहतात. पण प्रेक्षकांची नजर मात्र वेगळी असते. मी चुकीची नाही हे सांगण्याची मला गरज वाट नाही. जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा एक्सट्रा कल्ला पाहायला मिळेल.

निक्कीचा अभिजीतला मोलाचा सल्लानिक्की अभिजीतला मोलाचा सल्ला देताना दिसून येत आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय,"मी तुला जे सांगते ते उद्या तुझ्या ग्रुपमध्ये जाऊन सांगायचं नाही. एक मित्र म्हणून मी तुला सांगत असते. माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. उद्या जाऊन धोका देऊ नकोस. आपल्यातला जो कॅप्टन बनेल तो सुटेल. पण जर ते कॅप्टन झाले तर पहिलं किचन घ्यायचंय. दुसरं तुला तुझा पायाचा स्टेटस बघावा लागेल. कारण कोणी कोणावर ड्युटी थोपवू शकत नाही". तर दुसरीकडे आर्या टिश्यू पेपरवरुन निक्की आणि अभिजीतसोबत वाद घालत आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंत