भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात.
अभिनेत्री शिवानी बावकर कुटुंबासोबत आनंद घेतेय. सध्या शिवानी हिमाचलध्ये फिरतायेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिथलं फोटो शेअर केलंत. शिवानी आपली बहीण अनुष्का बावकर आणि आई-बाबांसोबत व्हॅकेशनवर गेलीय. नाईस फॅमिली, एक नंबर फॅमिली अशा कमेंट्स तिच्या फोटोवर येतायेत. शिवानीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अलीकडेच ती सोनी मराठीवरील कुसूम मालिकेत दिसली होती.
'लागीरं झालं जी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. या मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळवली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे.
कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती.ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपणे आणि बिनधास्तपणे बोलू शकते.त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं.