Join us  

बाबो..! कुशल बद्रिकेच्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेतलीय चक्क या व्यक्तीने, समोर आला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 6:34 PM

Kushal Badrike : कुशल बद्रिकेचा सोशल मीडियावरील व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच कलाकारांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. या शोमधील विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)चा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान या शोमधील त्याचा सहकलाकार आणि मित्र कुशल बद्रिके(Kushal Badrike)ने भाऊ कदमला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो बेडवर झोपलेला दिसत असून त्याच्या शेजारी भाऊ कदम झोपेत घोरताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, माझ्या आयुष्यातली प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणुस म्हणजे “भाऊ कदम”, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्‍या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन”घोर” शुभेच्छा.

रुपेरी आणि छोट्या पडद्यावर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची ही जोडी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडते पण ऑफस्क्रिनही त्यांची विनोदबुद्धी किती तल्लख आहे हे कुशलने या गमतीशीर व्हिडिओ पोस्टमधून दाखवून दिले आहे. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कलाकारांनी हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की कुशल तू या प्रेयसीला भाऊ म्हणतोस हे पाहून मजा वाटली. तर एका चाहत्याने लिहिले की की तुम्ही दोघांनी मिळून हसवून हसवून सगळ्या जगाची झोप उडवली आहे.

टॅग्स :कुशल बद्रिकेभाऊ कदमचला हवा येऊ द्या