छोट्या पडद्यावर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे ३६ गुणी जोडी. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील वेदांत आणि अमूल्या या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. इतकंच नाही तर या मालिकेतील प्रत्येक कलाकार सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे या कलाकारांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे या मालिकेतील बहिणी भावाची भूमिका साकारणारे दोन कलाकार चक्क एकमेकांचे रिअल लाइफ जोडीदार आहेत. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत.
या मालिकेत वेदांत वानखेडे त्याची बहीण आद्या आणि भाऊ विक्रांत यांच्यवर किती प्रेम करतो हे साऱ्यांनाची पाहिलं आहे. त्यामुळे पडद्यावर असलेली ही भावंडांची जोडी पडद्यामागेही तितकीच छान आहे. परंतु, वेदांत आणि विक्रांत यांची पडद्यावर बहीण असलेली आद्या खऱ्या आयुष्यात यांच्यापैकीच एकाला डेट करत आहे.
या मालिकेत वेदांत वानखेडी ही भूमिका अभिनेता आयुष संजीव साकारत आहे. तर, आद्याची भूमिका अक्षता आपटे आणि विक्रांतची भूमिका स्वानंद केतकर हे साकारत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतील विक्रांत आणि आद्या खऱ्या आयुष्यात एकमेकांचे लाइफ पार्टनर आहेत.
हो. अभिनेत्री अक्षता आणि स्वानंद गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच नाही तर त्यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ही जोडी लग्नदेखील करणार आहे. स्वानंद सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे त्याने अक्षता आणि त्याच्या साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नाही तर या दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या या जोडीची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.