Join us

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम प्रथमेश-मुग्धाच्या नात्यावर घरातल्यांची होती ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 2:13 PM

प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांनी एका मुलाखतीत ते प्रेमात कधी पडले, कोणी प्रपोज केले आणि जेव्हा घरच्यांना सांगायचे ठरले तेव्हा काय परिस्थिती होती याबद्दल सांगितले.

सारेगमप लिटल चॅम्पस(Sa Re Ga Ma Pa Little Champs)च्या पहिल्या सीझनमधून प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) घराघरात पोहचले. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे सातत्याने चर्चेत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. काही दिवसांपू्र्वी प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर या दोघांवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी ते प्रेमात कधी पडले, कोणी प्रपोज केले आणि जेव्हा घरच्यांना सांगायचे ठरले तेव्हा काय परिस्थिती होती याबद्दल सांगितले.

सर्वांनाच माहित आहे की, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या दोघांची ओळख सारेगमप लिटिल चॅम्समुळे झाली. त्यानंतर त्या दोघांनी अनेक एकत्र कार्यक्रम केले. यादरम्यान त्यांच्यात एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या. मात्र या भावनांना मोकळी वाट कशी करुन द्यावी हे समजत नव्हते. एके दिवशी कार्यक्रमाआधी प्रथमेशने सहज मुग्धाला विचारले. तिलाही हे अपेक्षित होते. मात्र तिने होकार द्यायला एक-दोन दिवस लावले आणि अखेर भेटून तिने होकार कळवला. ते दोघेही तीन-चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. अखेर त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगायचे ठरविले. 

घरच्यांची अशी होती प्रतिक्रियामुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या नात्याबद्दल घरी पाच-सहा महिन्यांपूर्वी सांगितले. मात्र त्यांच्या घरच्यांना या बद्दल थोडी कल्पना आली होती. त्यामुळे ज्या दिवशी घरी सांगितले त्याच्या पंधरा-एक दिवस आणखी उशीर केला असता तर घराच्यांनीच पुढाकार घेऊन त्यांना तुमचे काय चालले आहे, हे विचारले असते, असे मुग्धाने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. दोघांनीही त्यांच्या प्रेमाबद्दल आपापल्या घरी एकाच दिवशी आणि एकच वेळ साधून सांगितले. त्यामुळे ही आठवण त्यांच्यासाठी खास आहे. घरात त्यांच्या नात्याबद्दल समजल्यावर दोन्ही घरातल्या सदस्यांची प्रतिक्रिया अतिशय साधी असल्याचे प्रथमेशने सांगितले.