Join us

'स्वच्छ भारत' मोहिमेत योगदान देण्यासाठी प्रयत्न करेन - टीना दत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 6:30 AM

भारत यंदा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपले अॅण्ड टिव्ही कलाकार भारताच्या कल्याणाप्रति प्रतिज्ञा घेत आहेत आणि या दिवसाच्या आपल्या आठवणी सांगत आहेत.

प्रजासत्ताक दिन हा फक्त राज्यघटना स्थापन झाल्याचा दिवस म्हणून ओळखला जात नाही तर त्या दिवसापासून देशाने खूप काही साध्य केले म्हणूनही मानला जातो. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे आणि देश ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपले अॅण्ड टिव्ही कलाकार भारताच्या कल्याणाप्रति प्रतिज्ञा घेत आहेत आणि या दिवसाच्या आपल्या आठवणी सांगत आहेत.

 अविनाश सचदेव - या प्रजासत्ताक दिनी मी एका चांगल्या भारतासाठी शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो जिथे मानवी आणि नैतिक हक्क फक्त संविधानाचाच भाग नसतील तर प्रत्येक भारतीयाच्या अधिकाराचा भाग असतील. आपण खूप विकास साध्य केला आहे परंतु बरेचसे अद्याप साध्य करायचे आहे. माझा विश्वास आहे की, भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यासाठी एक मोठा कायदा अमलात आणला गेला पाहिजे. मला माहीत आहे की ही थोडी अतिशयोक्ती वाटेल पण हे अगदीच अशक्यही नाही. मागे वळून पाहताना या दिवसाच्या माझ्या सर्वाधिक आवडत्या आठवणी शालेय दिवसांच्या आहेत जेव्हा मी यलो हाऊसचा कॅप्टन होतो. मी राष्ट्रध्वज हातात धरायचो आणि प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये उतरायचो तेव्हा माझे हृदय अभिमानाने भरून यायचे.भाभीजी घरपर हैंमधील मनमोहन तिवारीजी ऊर्फ रोहिताश गौर भारताची राज्यघटना अमलात येऊन ७० वर्षे उलटली आणि मागील अनेक वर्षांत देशाची न्यायव्यवस्था उत्क्रांत होत गेली असली तरी आपण एकूणात महिलांना आणि दुर्दैवी घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यात कमी पडलो आहोत. भारताची महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलणारी कायद्यातील दुरूस्ती म्हणजे लहान मुलींवर झालेल्या बलात्काऱ्यांना मोठी शिक्षा देणे. माझा विश्वास आहे की या बदलामुळे आपल्या महिला अधिक आत्मविश्वासू होतील आणि त्यांना हव्या त्या पद्धतीने चालतील, बोलतील आणि कपडेघालतील. भारतीय नागरिक म्हणून आम्हालाही पाण्याच्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि नजीकच्या भविष्यात पाण्याच्या कमतरतेसाठी मोठ्या लढाया लढाव्या लागतील. या प्रजासत्ताक दिनी मी वाया जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवत राहण्याची शपथ घेतो आणि आणि प्रेक्षकांनाही ही शपथ घेण्याचे आवाहन करतो. आपण एकत्र येऊन पाण्याच्या कमतरतेच्या समस्यांवर उपाय काढू शकतो.

इशिता गांगुली - देशभक्त असणे म्हणजे देशाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा गौरव करणे होय आणि प्रजासत्ताक दिन हा एक असा दिवस आहे. परंतु आपण आपली देशभक्ती फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवू नये. मी आज ही शपथ घेते की, एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझ्यासमोर घडणाऱ्या प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवेन. मग ते कितीही लहान मुद्द्यांवर का असेना. आपण सर्वांनी भारताला आपल्या सर्वांच्या स्वप्नातील सुंदर आणि देखणा देश बनवण्याचे लक्ष्य समोर ठेवले पाहिजे. आम्ही शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करायचो त्या माझ्या सर्वांत आवडत्या आठवणी आहेत. आम्ही तिरंगा गणवेश घालायचो आणि स्किट आणि नृत्य असलेले कार्यक्रम सादर करायचो.

 

मोहित मल्होत्रा - या देशाचा नागरिक म्हणून या प्रजासत्ताक दिनी मी मला शक्य त्या प्रकारे माझ्या आसपासच्या परिसरातील स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो. सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि घाण करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे कारण भिंतींवर थुंकून किंवा खरवडून वैयक्तिक किंवा ऐतिहासिक मालमत्ता खराब करणाऱ्या लोकांविरोधात कोणत्याही प्रकारची शिक्षा नाही. भारताला अधिक स्वच्छ देश बनवण्यासाठी कठोर दंड आणि शिक्षा लागू केल्या गेल्या पाहिजेत. लहानपणी मी माझ्या आईवडिलांसोबत टीव्हीवर परेड पाहायचो आणि मला त्याचे खूपच आकर्षण वाटायचे. आम्ही परेड संपल्यावर आइसक्रीम खायला बाहेर पडायचो.

 

दीपशिखा नागपाल - २६ जानेवारीच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. लहान असताना आम्ही छान कपडे घालून झेंडा वंदनाला जायचो आणि या दिवसाला भारताच्या इतिहासात असलेले महत्त्व आम्हाला जाणवायचे. एक अभिमानी भारतीय म्हणून माझ्या मनात कायमच भारतीय संस्कृतीबाबत तसेच आमच्यामध्ये मागील काही वर्षांत रूजवण्यात आलेल्या मूल्यांबाबत आदर राहिला आहे. परंतु मला असे वाटते की या भारताचा नागरिक म्हणवून घेण्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटावा अशा प्रकारचा देश होण्यापासून आपण अनेक मैल लांब आहोत. एक भारतीय म्हणून मी महिलांच्या तसेच आपल्या देशातील अनाथ मुलांच्या विकासाप्रति पाऊल उचलण्याची शपथ घेत आहे. आजच्या समाजाची महिलांप्रति असलेली वागणूक आणि दृष्टीकोन बदलण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करेन आणि या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठीही प्रयत्नशील असेन.

 टीना दत्ता - ७० वर्षांपूर्वी राज्यघटना लागू करण्यात आली त्यानंतर देशाने अनेक टप्पे पार केले आहेत असा माझा विश्वास आहे. प्रत्येक नागरिकाला एक अभिमानी भारतीय होण्याची संधी देणारे अनेक कायदे अंमलात आणण्यापासून ते नवीन युगाच्या भारताची संकल्पना आणून प्रत्येक नागरिकाला योग्य त्या पद्धतीने वाढ होण्यास मदत करण्यापर्यंत आपण प्रगतीपथावरच जात आहोत. भारत प्रत्येक टप्प्यावर पुढे जात असताना मला वाटते की ही पावले उचलण्यात आपण मागे पडलो आहोत, विशेषतः पृथ्वी आणि आपल्या परिसराचा आदर करण्याबाबत हे घडले आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी माझ्या रोजच्या कामात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आणि आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेत चांगले योगदान देण्यावर भर देईन. मला आशा आहे की माझ्यासारखे अनेक प्रेक्षकही भारताला आपल्या नागरिकांसाठी स्वच्छ देश बनवण्यासाठी हे जाणीवपूर्वक पाऊल उचलतील.

 

टॅग्स :टिना दत्ताप्रजासत्ताक दिन