तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात तर नक्कीच वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:38 PM2018-08-13T16:38:02+5:302018-08-13T16:39:02+5:30

टीएलसीने एक वर्षाच्या अविश्वसनीय ट्रॅव्हल स्कॉलरशिपद्वारे अतिशय बोअरिंग जॉबमध्ये अडकलेल्या लोकांना आयुष्यात एकदाच मिळणारी अद्वितीय संधी आणली आहे. 

TLC offers once in a life time opportunity to people stuck in the most boring job | तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात तर नक्कीच वाचा...

तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात तर नक्कीच वाचा...

googlenewsNext

तुम्ही बोअरिंग जॉबमध्ये अडकले आहात? तो सोडायची इच्छा आहे? अज्ञात प्रदेशाची सफर करायची आहे? केवळ कल्पना केलेले जीवन जगायचे आहे? असे असेल तर आपल्याला आजवर ज्याची‌ ओढ होती, ते आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठे कॉलिंग आपल्यासाठी इथे येत आहे. भारतातील क्र. 1 चे लाईफस्टाईल चॅनल असलेल्या टीएलसीने एक वर्षाच्या अविश्वसनीय ट्रॅव्हल स्कॉलरशिपद्वारे अतिशय बोअरिंग जॉबमध्ये अडकलेल्या लोकांना आयुष्यात एकदाच मिळणारी अद्वितीय संधी आणली आहे. 

विजेत्यांना देशभर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हा प्रवास त्यांच्या वेळेनुसार भारतातील अतिशय दूरवरच्या ठिकाणी करतील आणि आधी त्यांना ज्या पदार्थांचे नावही माहीत नव्हते, त्यांचाही ते आस्वाद घेतील. हे आणखी रोमांचक करण्यासाठी, टीएलसी विजेत्यांना ‘द कॉलिंग’ मध्ये झळकण्याची आणि स्टार होण्याची संधीही देत आहे!

स्पर्धा अतिशय जिकिरीची असेल. आवेदकांना आयुष्यात सर्वात बोअरिंग काय वाटते हे दर्शवणारा तीन मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करावा लागेल. त्यातून तीन जणांना टीएलसी स्कॉलरशिपसाठी विजेते म्हणून निवडले जाईल. विजेत्यांना त्यांच्या बॅगा भरून पुढील बारा महिने देशातील आधी न बघितलेले भाग एक्स्प्लोअर करण्यासाठी जायचे आहे. स्कॉलरशिपमधील पहिल्या तीन महिन्यांमध्ये ‘द कॉलिंग’ या आगामी शोमध्ये झळकण्यासाठी शहरांमधील प्रवासाचा टप्पा असेल तर नंतरच्या अवधीमध्ये विजेत्यांना टीएलसीच्या सामाजिक असेटससाठी फिरावे लागेल.

‘द कॉलिंगचा’ चेहरा असलेल्या शॉर्ट लिस्ट केलेल्या तीन जणांना देशभरातील आठ राज्यांमध्ये फिरण्याची आणि तेथील संस्कृती अनुभवून तिथे मित्र बनवण्याची आणि तिथल्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. विजेत्यांना आठ जागी एक साहसाची पूर्तता केल्यानंतर त्यांची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचीही संधी मिळेल.

‘द कॉलिंगमध्ये’ सहभाग घेण्याची प्रक्रिया
www.thecalling.in वर लॉग इन करा (एंट्रीज 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पासून 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 पर्यंत देता येतील)
जास्तीत जास्त 3 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करा. आपला जॉब जगातला सर्वांत बोअरिंग का आहे हे सांगा आणि आम्ही आपल्याला टिएलसी स्कॉलरशिपसाठी का निवडू हे सांगा. 
सविस्तर फॉर्म भरा आणि त्यातले प्रतिसाद सबमिट करा.
टीएलसीवर आणि टीएलसीद्वारे सुरू केलेल्या युट्य़ुब चॅनलवर ‘द कॉलिंग’ प्रसारित केले जाईल.

Web Title: TLC offers once in a life time opportunity to people stuck in the most boring job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.