कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. दिल्लीच्या AIIMSरुग्णालायात त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे हास्य जगतावर मोठी शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. राजू श्रीवास्तव यांना ब्रेन स्ट्रोकदेखील आता होता. त्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक होती. जगभरातील चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते, मात्र त्यांचे दु:खद निधन झाले. आज दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान त्यांचे चाहते आणि सेलिब्रेटी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma)ने देखील सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
कपिल शर्माने इंस्टाग्रामवर राजू श्रीवास्तव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, आज पहिल्यांदा तुम्ही मला रडवलं आहे राजू भाई, अजून एक भेट झाली असती. देव तुम्हाला त्यांच्या चरणी स्थान ठेवो. तुमची खूप आठवण येईल. अलविदा.ओम शांती
एका शोने बदलले आयुष्य मुंबईत आल्यानंतर राजू श्रीवास्तव छोट्या छोट्या भूमिका करत होते. या वेळी 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' सुरू झाले, ज्यामध्ये राजू श्रीवास्तव यांनीही सहभाग घेतला. शोमधील त्याची कॉमेडी आवडली आणि हा शो नंतर त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या शोमध्ये 'गजोधर' या व्यक्तिरेखेने ते घरोघरी पोहोचले. राजू श्रीवास्तव या शोचे सेकंड रनर अप होते. जर आपण राजू श्रीवास्तव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर त्यांनी शिखा श्रीवास्तव यांच्याशी १९९३ मध्ये लग्न केले आणि दोघांना २ मुले आहेत. राजू श्रीवास्तव हे देखील राजकारणात सक्रिय होते.