‘मायावी मलिंग’साठी अभिनेता अंकित गुप्ताने घेतले या गोष्टीचे प्रशिक्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 09:34 AM2018-05-14T09:34:24+5:302018-05-14T15:04:24+5:30

बॉलिवूडमध्ये सर्वच अभिनेते पिळदार शरिरयष्टी कमावण्यात व्यस्त असतात.आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही.मात्र ...

Trainer took the role of an actor named Gupta for 'Mayavi Malinga'! | ‘मायावी मलिंग’साठी अभिनेता अंकित गुप्ताने घेतले या गोष्टीचे प्रशिक्षण!

‘मायावी मलिंग’साठी अभिनेता अंकित गुप्ताने घेतले या गोष्टीचे प्रशिक्षण!

googlenewsNext
लिवूडमध्ये सर्वच अभिनेते पिळदार शरिरयष्टी कमावण्यात व्यस्त असतात.आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या अभिनेत्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत काही कमी नाही.मात्र ते केवळ व्यावसायिक कारणांसाठी नव्हे, तर शरीर व तब्येत तंदुरुस्त राखणे हा त्यामागील सर्वात महत्त्वाचा हेतू आहे. आणि आता हाच कल टीव्हीवरील आघाडीच्या कलाकारांमध्येही दिसून येत आहे.‘स्टार भारत’वर अलीकडेच प्रसारित होऊ लागलेल्या ‘मायावी मलिंग’ या फॅण्टसी मालिकेत दुष्ट व सुष्ट शक्तींमधील संघर्ष चित्रीत करण्यात आला असून त्यासाठी त्यात अनेक अ‍ॅक्शन सीन आहेत.या अ‍ॅक्शन प्रसंगांचे चित्रण वास्तववादी व्हावे, यासाठी बहुसंख्य कलाकार विशेष मेहनत घेताना दिसत आहेत.अशाच कलाकारांपैकी एक अंकित गुप्ता असून तो या मालिकेत चेगू ही व्यक्तिरेखा साकारत आहे.अंकितची चेगू ही व्यक्तिरेखाच ‘मायावी मलिंग’ मालिकेत बहुसंख्य अ‍ॅक्शन प्रसंग साकारताना दिसत आहे. मालिकेत तो बरेचदा उघड्या छातीने अ‍ॅक्शन प्रसंग साकारतो, त्यामुळे त्याला शारीरिक तंदुरुस्ती राखणे आवश्यक बनले आहे.म्हणूनच अंकित गुप्ताने या भूमिकेसाठी निवड झाल्यावर संमिश्र मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडे यासंदर्भात विचारणा केल्यावर त्याने या गोष्टीला दुजोरा देताना सांगितले, “मी सुरूवातीपासूनच फिटनेस फ्रिक आहे.गेली आठ वर्षं मी नियमित व्यायाम करतो. मायावी मलिंगमधील चेगू या व्यक्तिरेखेची माहिती मला देण्यात आल्यावर मला जाणवलं की या व्यक्तिरेखेसाठी लागणारी चपळता माझ्या अंगी नाहीये.हवेत दोरावर लटकून मारामारीचे प्रसंग साकार करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. तेव्हा मी सुरुवातीपासूनच तैकवौंडो आणि कॅलिस्थेनिक्स शिकण्यास सुरुवात केली. तैकवौंडो हा मार्शल आर्टसचा एक प्रसिध्द प्रकार असून कॅलिस्थेनिक्समध्ये तुमच्या शरीराच्या वजनाच्या व्यायामाचा वापर केला जातो.या दोन्ही गोष्टी मी गेले सात-आठ महिने करत आहे.मार्शल आर्टसचे प्रकार शिकणं आणि त्यांचा अचूक वापर करणं ही फार मेहनतीचं काम आहे.पण कठोर परिश्रमाचं फळही तितकंच सुंदर असतं.”


‘मायावी मलिंग’ ही मालिका प्रेक्षकांना एका काल्पनिक दुनियेत घेऊन जाईल, ज्यात तीन राजकन्या आपले राज्य टिकविण्याची धडपड करताना दिसतील.जीवनात नायक किंवा नेता बनण्याची उर्मी प्रत्येकाच्याच मनात वसत असते, हा संदेश प्रणाली, ईश्वर्या आणि गरिमा या तीन राजकन्यांची कथा देते.प्रणाली, ईश्वर्या आणि गरिमा या तीन राजकन्यांच्या भूमिका अनुक्रमे नेहा सोळंकी,वाणी सूद आणि ग्रेसी गोस्वामी या अभिनेत्री साकारणार असून हर्षद अरोरा आणि शक्ती आनंद हे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.विवेक बहेल आणि ‘पेनिन्सुला पिक्चर’ यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील विशेष व्हीएफएक्स ‘प्राण स्टुडिओज’ ही जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी पुरविणार आहे.या स्पेशल इफेक्टमुळे प्रेक्षकांना अफलातून दृष्ये पाहायला मिळतील.

Web Title: Trainer took the role of an actor named Gupta for 'Mayavi Malinga'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.