मराठी मालिकांचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवण्यासाठी निर्माते नवनवीन ट्विस्ट आणत असतात. मागील आठवड्याप्रमाणे याही आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. यावेळी दुसरा क्रमांक 'स्टार प्रवाह धुमधडाका २०२२' ने पटकावला आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका या आठवड्यातही तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्टार प्रवाहवरील 'मुलगी झाली हो' ही मालिका गेल्या दोन आठवड्यांप्रमाणे पाचव्या क्रमांकावर आहे. तर 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका सातव्यावरून सहाव्या क्रमांकावर आली आहे. झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे. स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे.
'येऊ कशी तशी मी नांदायला' दहाव्या स्थानावर
'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या आठवड्यात नवव्या स्थानावर आली आहे. गेल्या आठवड्यात नवव्या क्रमांकावर असलेली झी मराठीवरील मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' या आठवड्यात दहाव्या स्थानावर आहे. सहकुटुंब सहपरिवार आणि देवमाणूस या मालिकांना टीआरपीच्या शर्यतीत टॉप १० मध्ये यावेळी जागा मिळू शकली नाही.