तू चाल पुढं’ ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून हि मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. शिल्पी आणि विद्युतचा घटस्फोट झालेला असताना आत अश्विनी आपला भाऊ विद्युतला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देणार आहे. अश्विनीच्या मनात कार्तिकी आणि विद्युतला एकत्र आणण्याचा विचार आहे. पण त्याचवेळी आता शिल्पी एक मोठा खुलासा करणार आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक नवं वादळ येणार आहे.
सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पीचे सगळेच डाव तिच्यावर उलटताना दिसले आहे. शिल्पनीने आतापर्यंत अनेक कट अश्विनी विरोधात रचले आहे. मात्र या सगळ्यात तिच फसली. तिच्या सततच्या कटकारस्थानांमुळे अश्विनी आणि श्रेयस दोघांना आपल्या मुलींना घेऊन राहतं हक्काचं घर सोडावं लागलं होतं. यानंतर शिल्पीने विद्युतला घटस्फोट देऊन विक्रमसोबत प्रेमाचं नाटकही केलं. मात्र, इथेही तिचा डाव फसला आहे.
घटस्फोटानंतर शिल्पाचा मुलगा संजूचा ताबा कोर्टाने विद्युतकडे दिला आहे एकदा संजूला भेटायला आलेली शिल्पी त्याच्या आजारपणामुळे घरातच थांबली होती. मात्र, याचवेळी विद्युत आणि शिल्पी एकमेकांच्या जवळ आले. यामुळेच शिल्पी आता पुन्हा आई होणार आहे.
माई अश्विनीला कार्तिकी आणि विद्युत बद्दल सांगायला फोने करते. तर दुसरीकडे शिल्पीला प्रपोज करण्यासाठी विक्रम घरी आलेला आहे आणि तो सगळ्यांसमोर तिला प्रपोज करतो. पण शिल्पी नकार देते. ती अश्विनीला आपण प्रेग्नेंट असल्याचं सांगत हे बाळं आपल्याला हवं असल्याचं सांगते. अश्विनीला हे ऐकून धक्का बसतो. आता यावर अश्विनीसह घरातल्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.