'तू चाल पुढं'मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन अश्विनी करले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:12 PM2022-10-05T17:12:34+5:302022-10-05T17:22:02+5:30

'तू चाल पुढं' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे.दिपा परबनं साकारलेली अश्विनीची भूमिका रसिकांची पसंतीस उतरली.

TuChal Pudha serial did Ashwini burn Ravana's ego in the relationship between husband and wife on the occasion of Dussehra | 'तू चाल पुढं'मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन अश्विनी करले का?

'तू चाल पुढं'मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर नवरा बायकोच्या नात्यातील अहंकाररूपी रावणाचे दहन अश्विनी करले का?

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं वळवायचं  हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. येणाऱ्या दसरा विशेष भागात अश्विनी श्रेयस बाबत महत्वपूर्ण भूमिका घेणार आहे.  मालिकेत नवरात्र आणि दसरा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे दसऱ्यादिवशी अश्विनी रावण दहन करणार आहे. याच मुहूर्तावर ती श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार आहे.

 अश्विनी रावण दहन करताना म्हणते कि, ''एका आगीच्या बाणाने हा लाकडी रावण जळून खाक होऊ शकतो पण आपल्या आत जो रावण दडलाय त्याचं काय? अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची". मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं.'' एवढं बोलून ती श्रेयसकडे पाहते. अश्विनीचा हा दृष्टिकोन प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. अल्पावधीतच हा प्रोमो हिट झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी विशेषतः महिला प्रेक्षकांनी या पोस्टवर कमेंट करत अश्विनीला पाठींबा दर्शवला आहे.

आतापर्यंत नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला पाठींबा देणारी अश्विनी श्रेयसला त्याची चूक दाखवून देणार  हे पाहणं आता औत्सुकत्याचं ठरणार आहे. 

Web Title: TuChal Pudha serial did Ashwini burn Ravana's ego in the relationship between husband and wife on the occasion of Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.