Join us

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची होणार रिएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 17:40 IST

आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे.

स्टार प्रवाहच्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेत नुकतीच मंजुळा सातारकरची धमाकेदार एण्ट्री झाली आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैदेहीच परत आल्याची खात्री झाली आहे. वैदेही सारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजे वैदेही नव्हे. आतापर्यंत स्वराज आणि तिची भेट झाली होती. मात्र आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे. 

पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने कामतांच्या घरात प्रवेश केला असला तरी तिचा मनसुबा मात्र भलताच आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराज आणि मोनिकाच्या आयुष्यात नवं वादळ येणार हे नक्की.

एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसेल. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे. साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर मंजुळा हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय. एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. 

टॅग्स :स्टार प्रवाह